स्वप्न कधी छोटी नसतात! अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ 23 मे रोजी प्रदर्शित होणार

स्वप्न कधी छोटी नसतात! अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला ‘चिडिया’ 23 मे रोजी प्रदर्शित होणार

Chidiya Will Be Released across India from 23 May : आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेल्या आगामी ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाचे (Chidiya Movie) पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. मीडिया वर्क्स, उदाहरणार्थ निर्मित या संस्थेअंतर्गत या चित्रपटाची (Entertainment News) निर्मिती करण्यात आली आहे. स्मायली फिल्म्स यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली (Bollywood Movie) आहे. मेहरान अमरोही लिखित आणि दिग्दर्शित, ‘चिडिया’ ही एक आठवण आहे.

मुंबईतील चाळीच्या घरात राहणाऱ्या शानू आणि बुआ या दोन उत्साही भावांची हृदयस्पर्शी गोष्ट आहे. केवळ कल्पनाशक्ती, आशा, त्यांची आई आणि समाजातील लोकांच्या मदतीने ते त्यांच्या परिस्थितीपेक्षा खूप मोठ्या स्वप्नाचा पाठलाग कसा करतात? मुले त्यांची स्वप्ने जिवंत ठेवण्यासाठी ज्या अदृश्य लढाया लढतात. त्याची एक रंजक गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.

यावर्षी वेळेआधीच केरळमध्ये मान्सून धडकणार; वाचा, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

दिग्दर्शक मेहरान अमरोही म्हणतात की, चिडिया हे बालपणीला लिहिलेल प्रेमपत्र आहे. हा चित्रपट उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहण्याबद्दल आहे, आशा कधीही जुनी होत नाही याची हा चित्रपट शांतपणे आठवण करून देतो. या चित्रपटात अभिनेते विनय पाठक, अभिनेत्री अमृता सुभाष, इनामुलहक, ब्रिजेंद्र कला आणि उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत शैलेंद्र बर्वे, संकलन मोहित टाकळकर, कलादिग्दर्शन प्रितेश खुशवाह यांचे आहे. तर वितरण रिलायन्स एंटरटेनमेंटने करणार आहे.

पहलगामवरील वक्तव्यावरून कर्नाटक फिल्म चेंबर आक्रमक; सोनू निगमवर बहिष्कार टाकत माफीची मागणी

जवळजवळ एक दशकापूर्वी पूर्ण झालेल्या चिडिया चित्रपटाने आधीच जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे, चेक रिपब्लिक (झ्लिन आयएफएफ), द नेदरलँड्स (सिनीकिड), द यूएसए (एसएआयएफएफ), रशिया (स्पिरिट ऑफ फायर आयएफएफ), इराण (मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आयएफएफ) आणि त्यापलीकडे असलेल्या महोत्सवांमध्ये मने जिंकली आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube