Rupali Chakankar on Amol Kolhe : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटात सातत्याने टीकेच्या फैरी झडत आहे. काल पिंपरी चिंचवडमधील विजयी संकल्प मेळाव्यात बोलतांना खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) गुलाबी रंगाच्या जॅकेटवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
अमित शहांचे ‘चॅलेंज’; पवारांना घेरण्यासाठी मोहोळांनीही हात उंचावून थोपटले दंड
आज पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा झाला. यावेळी केलेल्या भाषणात चाकणकरांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केली. घराच्या समोर रस्ता न बनवू शकणाऱ्यांनी अजित दादांवर बोलू नये. त्यामुळे गुलाबी स्वप्नावर शब्द न काढलेले बरे. तुमची लोकसभेची सूज आम्ही विधानसभेला उतरवू, असा इशारा चाकणकरांनी दिला.
विधानसभा एकत्र पण… आगामी निवडणुका युतीसह लढण्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा
त्या म्हणाल्या, कोल्हेंनी अजितदादांवर टीका करू नये. पिंपरी-चिंचवड परिसरात विदेशात असल्या सारखे वाटते. कारण इथले रस्ते आणि कारखाने हे सर्व दादांचे गुलाबी स्वप्नं आधीच पूर्ण झालेले आहेत, असंही चाकणकर म्हणाल्या.
काय म्हणाले होते अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणात लाडकी बहिण योजना आणि अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटवरून महायुती सरकारवर टीका केली होती. अमोल कोल्हे म्हणाले होते की उद्या इथं कोणाची तरी मेळावा आहे. मात्र, मला असं समजलं की, हा मेळावा जयपूरला आहे. कारण काहींना पिंक कलरला पसंती दिलीये. आता कोणत्या रंगाला पसंती द्यायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त तो गुलाबी रंग पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा केवळ राजकीय व्यासपीठावर दिसू नये, असा खोचक टोला कोल्हेंनी लगावला होता.
अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
तर अजित पवार म्हणाले, आता मला म्हणतात दादा तुम्ही पिंक कपडे घालायला लागले, आता मला सांगा आज काय पिंक जॅकेट घातलाय का? मला सांग ह्यांच्या का पोटात दुखंतय? आता बघा बरं तुम्ही काय म्हणता, दादा आज लयभारी जॅकेट दिसतंय… तुम्ही फोटो काढता, हे पाहून मग मी परत तेच कपडे घालतो… त्यात काय वाईट आहे, असं अजित पवार म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=PZMv_d0e7RU