Download App

बच्चे मन के सच्चेच असतात, पण काही खोड्या काढणारे; रुपाली चाकणकरांचा रोहित पवारांना टोला

  • Written By: Last Updated:

Rupali Chakankar : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने छापा टाकला. या छापेमारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईवरून रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला होता. त्याला आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणक (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली. बच्चे मन के सच्चेच असतात. पण काही खोड्या काढणारे असतात, असा टोला त्यांनी लगावला.

2019 ला सेनेसोबत मग आता भाजपसोबतच काय बिघडलं? अजितदादांचा खडा सवाल 

आज अजित पवार गटाचा संवाद मेळावा मुंबईत झाला. त्यावेळी बोलतांना चाकणकर यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली. अजितदादांच्या कामाचा धडाका पाहता विरोधकांना नैराश्य आलं आहे. त्यांचं मानसिक संतुलन पूर्ण ढासाळलं. ज्योत निष्ठेची पेटवता पेटवता सामाजिक तेढ निर्माण करणारी बेताल वक्तव्य करून ज्योत कधी मालवली ते कळलं नाही. तू मोठा की मोठा या स्पर्धेतच दोन दिवसाचं शिबीर संपलं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

संघर्ष यात्रा काढली, पण जनाधार नाहीच
सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. तर रोहित पवारांनी जन संवाद यात्रा काढली होती. यावरूनही चाकणरांनी जोरदार फटकेबाजी केली. त्या म्हणाल्या, कुठं आक्रोश तर कुठं संघर्ष यात्रा काढली. मात्र, जनाधार कुठंच नाही, अशी टीका त्यांनी केली.

आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही; ‘सिंहासन’ची आठवण काढत फडणवीसांचा ठाकरेंना टोला 

दोन दिवसांपूर्वी रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर ईडीने छामेमारी केली. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटावर टीका केली होती. यावरून अजित पवारांनी रोहित पवारांवर निशाणा साधला होता. रोहित पवार कच्चा आहे. कच्चा-बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी, एवढा काय तो मोठा झालेला नाही. त्याला माझे कार्यकर्तेच उत्तर देतील, अशी टीका अजितदादांनी केली होती.

तर आता चाकणकरांनीही रोहित पवारांवर टीकास्त्र डागलं. त्या म्हणाल्या, बच्चे मन के सच्चेच असतात. वाद नाही. पण, त्यातलं एखादं दुसरं खोडसाळ असतं. खोड्या काढून निरागसतेचं आव आणतं. टीका करून स्वताला मोठं करायचा प्रयत्न करतं, असा टोला त्यांनी लगावला.

दादा तुमचा निर्णय सर्वोत्तम
काही महिन्यापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून वेगळी चुल मांडली. त्यावरून अजित पवार गटावर सातत्याने टीका केली जाते. दरम्यान, आता चाकणरांनी हे निर्णय सर्वोत्तम होता, असं सांगिलतं. दादा तुम्ही जो निर्णय घेतला, तो उत्तमच नाही, तर सर्वोत्तम आहे, असं चाकणकर म्हणाल्या.

follow us