Download App

शरद पवारांनीच मराठा समाजाची माती केली, सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. मात्र त्यांनी मराठा समाजाची मातीच केली

  • Written By: Last Updated:

Sadabhau Khot : गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) लढा सुरू आहे. मात्र, अद्याप आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं जरांगे महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) मोठं विधान केलं. फडणवीसांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं, तर शरद पवारांनी मराठा समाजाची मातीच केली, असा हल्लाबोल त्यांनी केली.

फडणवीस-जरांगेंमधील भांडण नकली, ओबीसींना फसवण्यासाठी ते ठरवून भांडताहेत; आंबेडकरांचा दावा

आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर खोत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं केलं. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. शरद पवार एकदा, दोनदा नव्हे तर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. मात्र त्यांनी मराठा समाजाची मातीच केली, अशी टीका खोत यांनी केली.

Olympics 2024 मधील यशामागे वडिलांचा मोठा त्याग; कसा आहे मनू भाकरचा प्रेरणादायी प्रवास? 

मराठा समाजाला एकदा आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, सारथी सारखी संस्था असेल त्या माध्यमातून 20 विद्यार्थी यूपीएसीमध्ये आले. अशा अनेक योजना मराठा समाजासाठी फडणवीस यांनी केल्या. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुणा गोविंदाने राहले पाहिजे, असं खोत म्हणाले.

मी मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदेतज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू, असे खोत म्हणाले. हा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा असेल. कोणतंही आंदोलन चालवत असतांना सरकार आपल्याशी चर्चा करत नसेल तर आंदोलन आक्रमकपणे करायचे असते. सरकार आपच्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी, यातून मार्ग निघेल, असा विश्वासही खोत यांनी व्यक्त केला

शेतीच्या बांधावरून मला विधानभवनाच्या बांधावर उभं केलं. मी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मी सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन. या पदाचा उपयोग मी महाराष्ट्रातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला.

follow us