Download App

देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘समृद्धी’वर 900 अपघात; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

Eknath Khadase On Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्ग हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. परंतु अलिकडच्या 100 दिवसांचं चित्र पाहिलं तर अनेकांचं स्वप्न याच्यामध्ये भंगलेलं आहे. आज जो अपघात झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. आतापर्यंत या समृद्धी महामार्गावर 900 अपघात झाले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्या अपघातांमध्ये मृत पावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी राज्य सरकारने या अपघाताची कारणं शोधली पाहिजेत. त्याचबरोबर हे अपघात होऊ नयेत, यासाठी काही उपाययोजना करता येतील का याकडे राज्य सरकारने प्राधान्याने केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadase)यांनी राज्य सरकारकडे केली आहे.(Samruddhi Highway Accident Eknath Khadase criticize on devendra fadnavis 900 accident)

Ketaki Chitale: केतकीच्या ‘तुरुंगातील प्रवासावर’ प्रकाशित होणार पुस्तक? नेमकं काय घडलं होतं…

यामध्ये चार लेन, सहा लेन असे मोठमोठे रस्ते तयार करण्यात आले. समृ्द्धी महामार्ग तयार करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक टिपणी केली होती की, न्हाईच्या (National Highways Authority of India) तत्वांचे पालन केले जात नाही. केंद्रीय मंत्री गडकरी (Union Minister Nitin Gadkari)यांनी काही सूचना केल्या होत्या, त्यांचं राज्य सरकारकडून तंतोतंत पालन केलं जावं, असाही सल्ला यावेळी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

मध्यरात्री समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन पेट घेतल्याने बसमधील 26 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बसमध्ये ड्रायव्हसह 33 जण होते. यातील एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. आग एवढी भयंकर होती की फक्त बसचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे.

नागपूरवरुन खासगी प्रवाशी बस ही मुंबईला निघाली होती. सिंदखेडराजाजवळ बस धडकून रस्त्यावर उलटली. बस उलटून ती रस्त्यावर घासल्याने तीने पेट घेतला. बघता बघता संपूर्ण बसने चांगलाच पेट घेतला. मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रवासी झोपलेले होते. त्यातच अचानक या सर्व गोष्टी घडल्याने प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता आले नाही. अन् त्यामुळे मोठी जीवितहानी झाली.

Tags

follow us