Download App

Video : मोदी, शाह अन् फडणवीस कधीपासून हिंदू झाले?; राऊतांची नाशकातून ‘तोफ’ धडाडली

Sanjay Raut यांनी शिवसैनिकांना संबोधनपर भाषण दिलं त्यावेळी त्यांनी भाजप तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस टीकास्त्र सोडलं

Sanjay Raut Creticize Amit Shah and Devendra Fadanvis at Nashik UBT Nirdhar Melava : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा निर्धार मेळावा नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पार पडला. त्याची आज सांगता झाली. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह पक्षातील नेते उपस्थित होते. त्यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संबोधनपर भाषण दिलं ते म्हणाले की, आमचा मेळावा बातम्यांमध्ये येऊ नये म्हणून भाजपने नाशिक शहरात दर्गे पाडण्याची मोहीम राबवली. पण आजच्या शिबिराने नाशिकमध्ये शिवसैनिक बळकट असल्याचं दाखवलं.

काय म्हणाले संजय राऊत?

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमचा मेळावा बातम्यांमध्ये येऊ नये म्हणून भाजपने नाशिक शहरात दर्गे पाडण्याची मोहीम राबवली. पण आजच्या शिबिराने नाशिकमध्ये शिवसैनिक बळकट असल्याचं दाखवलं. तसेच नाशिकमध्ये आमचा पराभव झाला. याचं विश्लेषण थेट अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी केलं कारण त्यांनी जसं सांगितलं की, ईव्हिएम हॅक होऊ शकतं तसंच नाशिकमध्ये झालं आहे.

अमित शाहजी… खरोखरच शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा; उद्धव ठाकरेंनी नाशिकमधून तोफ डागली

पुढे राऊत म्हणाले, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस कधीपासून हिंदू झाले. जे सर्वात जास्त पापी कपटी आणि ढोंगी असतात ते स्वत: ला हिंदू समजतात. आम्ही संघर्ष करू अन् उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठाम उभे राहू आणि भाजपचं ढोंग उघड पाडू. तसेच राज्यात ठाणे की, रिक्षा, दाढी आणि चष्मा ते परत गावाला गेलेय तसेच महाराष्ट्र एवढा अंदश्रद्धाळू झालाय की, पौर्णिमा अमावस्या आली की, आम्हाला भीती वाटते कुणाचा बकरा कापणार? त्यामुळे आता सर्व महाराष्ट्राच्या नजरा उद्धव ठाकरेंकडे आहेत. तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. तसेच जे गावाला गेले आहेत. देखील तुम्ही काय बोलता याकडे लक्ष ठेवण्यासाठी टिव्ही लावून बसले आहेत.

follow us