शिवाजी महाराजांबद्दल खरोखर आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा; ठाकरेंची मागणी

शिवाजी महाराजांबद्दल खरोखर आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा; ठाकरेंची मागणी

Uddhav Thackeray Shibir in Nashik for Upcoming Elections : विधानसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाला अपयश मिळालं. हेच अपयश धुवून काढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी उभारी देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच नाशिकमध्ये शिबिर (Upcoming Elections) घेतलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय.

वेळीच सावध व्हा! झोपण्याआधी मोबाईल पाहणे येवू शकते अंगलट, ‘या’ गंभीर समस्यांची शक्यता

उन्हाने सगळेच गरम होतात, पण विचारांनी किती तापला यावरून उद्याच्या (Uddhav Thackeray Shibir in Nashik) भविष्याची दिशा निश्चित होते. जनता पक्षाने देशाचे धिंडवडे, वाट लावली. त्याच देशाने पुन्हा इंदराजींना पदावर बसवले. अमित शाहजी जर तुम्हाला खरोखर शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल, तर शिवजयंतीला देशभर सु्ट्टी जाहीर करा, अशी मागणी आज भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केली आहे . आमच्या देशाचं दैवत, इकडे येवून फक्त मतांसाठी श्री शिवाजी महाराज बोलू नका, असा देखील टोला ठाकरेंनी लगावला आहे.

महापुरुषांचा अवमान! माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा उपोषणाचा तिसरा दिवस…

आपण काम कशासाठी करतो, हे ठरवलं पाहिजे. काल परवा बातमी आली की, खैरेसाहेब नाराज. ही माणसं जावूच शकत नाही. सगळे माझ्यासोबत आहेत, अन् माझ्यासोबतच राहणार आहे. बूथ अध्यक्ष, बूथ सरचिटनीस, सदस्य, लाभार्थी प्रमुख, दहा सदस्यांची नावे, ही तयारी आपण केली पाहिजे. 12 सदस्यांत तीन महिला प्रतिधा असाव्या. किमान एक एसी अन् एसी प्रतिनिधी असावी.

बूथ मॅनेजमेंट गरजेचं आहे. बोगस वोटिंग थांबवण्यासाठी बूथ प्रमुख मतदाराला चेहरा ओळखणारा हवा.  मी कर्जमाफी करून दाखवली होती.  मागील निवडणुकीत आपण लोकांचा भ्रम पुसुन टाकू शकलो नाही. प्रत्येक ठिकाणी जावून शिवसेनेने काय केलंय, हे सांगणं देखील गरजेचं आहे. थोतांड बोलायची गरज नाही.

फेक नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुख्यमंत्री पदाच्या इभ्रतीला मी डाग लागू दिला नव्हता. सगळ्यांना समानतेने वागवलं होतं. वक्फबोर्डवरून विरोध केला. कारण त्याचा अन् हिंदूंचा काडीचाही संबंध नव्हता. त्या ठरावाच्या वेळी दोन दिवस अमित शाह आणि त्यांच्या नेत्यांनी केलेली भाषणं सगळ्यांना ऐकवा, असं आवाहन भरसभेत उद्धव ठाकरे यांनी केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube