Download App

सांगलीत चंद्रहार पाटीलच अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मैत्रीपूर्ण लढती; राऊतांचा कॉंग्रेसला इशारा

Image Credit: Letsupp

Sanjay Raut on Sangali loksabha Candidate : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ( sangli loksabha ) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील कॉंग्रेसला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, सांगलीत चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तसेच मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. तसेच एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. असा इशारा राऊत यांनी दिला.

Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर

आज ( 7 एप्रिल ) पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊतांनी सांगलीच्या उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, विश्वजीत कदम विशाल पाटिल यांच्या सहित काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट सर्वजन चंद्राहार पाटील यांचा प्रचार करतील. सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हाय कमांडकडून सुद्धा तशी घोषणा केली जाईल.

उत्तर ते दक्षिण, 230 जागा अन् स्वबळावरील 8 पक्ष; भाजप-काँग्रेसची वाढलीय ‘धाकधूक’

विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांचाच प्रचार करतील. अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. सांगलीमध्ये संजय राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला. तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात. माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे. याबाबत विश्वजीत कदम यांच्याबरोबर सुद्धा फोनवर बोलणं झालं आहे. असं राऊत म्हणाले.

आधीपासूनच सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात असतानाच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी जाहीर सभेत पैलवान चंद्रहार पाटलांची (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये धूसफुस सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून आग्रह धरला जात आहे. सांगलीच्या उमेदवाराबाबत काँग्रेस नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. काही दिवसांपूर्वीच विश्वजित कदमांसह विशाल पाटलांनी दिल्लीत काँग्रेसच्या हाय कमांडची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. मात्र, अद्याप सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या हाय कमांडच्या नेत्यांकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

follow us

वेब स्टोरीज