Download App

नागपूर शहर चार तासात बुडालं, हाच का तुमचा विकास? राऊतांचा फडणवीसांना सवाल

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Devendra Fadanvis : नागपुरात शनिवारी मध्यरात्रीपासून रेकॉर्डब्रेक मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नाग नदीला पूर आला आहे. नाग नदीच्या काठावर असलेल्या कित्येक घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. त्यात अनेक घरांचं मोठं नुकसानही झालं आहे.अख्यं शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. या पुरात तीन मृत्यू झाले आहेत. दरम्यान, या सगळ्या परिस्थितीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली आहे.

आज माध्यमांशी बोलतांना संजय राऊतांना नागपुरातील पूर परिस्थितीवर विचारलं असता ते म्हणाले की,नागपुरात आलेला पूर आणि प्रलय ही नैसर्गिक आपत्ती आहे.यात किमान १० हजार घराचं नुकसान झालं. अनेकांची घरं,बंगले पाण्यात बुडाली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःला नागपूरचे सुपुत्र मानतात. मात्र, नागपुरात हाहाकार सुरू होता, तेव्हा ते देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणपतीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते, अशी टीका राऊतांना केली.

ते म्हणाले, फडणवीस यांच्यावर टीका झाल्यावर ते नागपुरात गेले.मुंबई सांभाळता येत नाही, असं आम्हाला नेहमी म्हटलं जात होतं. मात्र कोरोना, लॉकडाऊन, प्रलय अशी आव्हानं असतांनाही शिवसेनेनं मुंबई उत्तमरित्या सांभाळली.

ठाकरेंच्या दोन वाघांशी राणेंचा थेट पंगा; संजय राऊत, अंबादास दानवेंविरोधात हक्कभंगाची नोटीस 

फडणवीस यांचा या पुरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. यावरूनही राऊतांना फडणवीसांवर टीका केली. काल फडणवीस यांना जी पुरग्रस्त लोक, महिला भेटण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना ढकललं जात होतं, हे दुर्दैवी चित्र काल महाराष्ट्राने पाहिल्याचं राऊत म्हणाले.

दरम्यान,चार तासांच्या पावसाने नागपूर पाण्यात बुडालं. कुठे आहे नागपूरचा विकास? नागपूरची रचना, विकास कुठं आहे? कुठं होते नागपूरचे सुपुत्र? चार तासाच्या पावसात सर्व काही वाहून गेलं. मात्र, नागपूरचे तथाकथित सुपूत्र हे मुंबईत राजकारण करत होते. नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी त्यानंतरच्या उपाययोजन करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. हा माणूसही संवेदनाशुन्य आहे. फडणवीस शिवसेना आणि मुंबईवर टीका करतात. मात्र, आता त्यांना अधिकार आहे का? ते पळून गेले. चार तासात शहर बुडाले? हाच का तुमचा विकास असा सवालही राऊांनी केला.

एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. यानंतर ठाकरे गटाने शिंदे समर्थक आमदारांवर याचिका दाखल केली होती. सुप्रिम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं. दरम्यान, आज 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी होणार आहे.यावर बोलतांना सजंय राऊत म्हणाले की, घटनाबाह्य सरकार मांडीवर बसवून कसं चालवलं जातंय, हे सर्व जगानं पाहिलं. या देशात संविधान आणि कायद्याचा मान राखला जाईल, असा विश्वास आम्हाला आहे, असं ते म्हणाले.

Tags

follow us