Download App

नड्डांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिला; संजय राऊतांनी डिवचलं

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : सध्या देशात आणि राज्या लोकसभा निवडणुकांच (Lok Sabha elections) वारे वाहायला लागले. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. सध्या महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकींचा फॉर्म्युला ठरवतांना दिसत आहे. यामध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये अनेक मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोलल्या जातं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी राऊतांनी भाजपसह (BJP) शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाला डिवचलं. जेपी नड्डांनी (JP Nadda) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कमळावर लढण्याचा प्रस्ताव दिल्याचा आरोप राऊतांनी केला.

विमानतळावर सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला नसीरुद्दीन शाहने ढकललं, व्हिडिओ होतोय व्हायरल 

आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. जागा वाटपाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘मविआची जी चर्चा आहे जागावाटपाची त्याची चिंता करायची कोणाला गरज नाही. आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण देशात जागावाटपाबाबत अत्यंत संयमी चर्चा कोणत्या राज्यात सुरू असेल तर ती महाराष्ट्रात चालू आहे. कारण आम्ही लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये काम करत आहोत. सर्वांशी चर्चा करूनच जागावाटपाच्या तिढा सोडवणार असल्याचा दावा राऊत यांनी केला.

Mrunal Thakur : ब्लॅक आऊडफिटमध्ये मृणाल ठाकूर हिचा जलवा पाहून चाहते फिदा 

पुढं बोलतांना त्यांना भाजप, शिंदे गट आणि अजिद पवार गटावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, काल जे. पी. नड्डा मुंबईत आले होते आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटासमोर प्रस्ताव ठेवला. नड्डांनी त्यांना कमळावर लढा असं म्हटलं आहे. कारण, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह जरी तुम्हाला मिळालं असलं तरी लोक तुम्हाला निवडूण देणार नाहीत. त्यामुळं कमलावर लढा. कमलाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव नड्डांनी दिला, असा आरोप राऊतांनी केला.

जे चिन्ह त्यांनी चोरलं, त्या चोरलेल्या चिन्हावर लढण्याची त्यांची हिंमत नाही. भाजपला त्यांच्या चिन्हावर त्यांना लढू देण्याचं धाडसं नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला.

शरद पवारांच्या गटाला निवडणूक चिन्ह मिळाल्यावर संजय राऊत म्हणाले, ‘आतापासून महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हातात मशाली घेऊन तुतारी वाजवणार आहे. अत्यंत चांगल चिन्ह त्यांना मिळालं आहे, असं राऊत म्हणाले.

अजित पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे एका बैठकीनिमित्त एकत्र आले होते. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरही राऊतांनी भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवार पालकमंत्री आणि सुप्रिया सुळे याच मतदारसंघाच्या खासदार आहेत. हा मतदारसंघ रोहित पवार यांच्या जवळचा आहे. त्यामुळे ते सर्व सरकारी बैठकीला गेले, असं संजय राऊत यांनी सांगितले.

follow us