Sanjay Shirsat On Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपावरून चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील चर्चेचं गुऱ्हाळ अद्यापह पुढं सरकलं नाही. निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा दावा केला आहे.
Nora Fatehi: नोरा फतेहीचा मुंबई मेट्रोमध्ये झिंग झिंग झिंगाट, Video एकदा पाहाच
महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत अजूनही मतभेद आहेत. जागावाटपाचे तिढा अद्याप सुटला नाही तर लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर आम्ही निवडणूक लढवू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना दिला. त्यानंतर हाच धागा पकडून माध्यमांशी बोलतांना आमदार संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीशी युती करणार नसल्याचा दावा केला आहे. आंबेडकर हे महाविकास आघाडीशी युती करणार नाहीत. कारण, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं कधीही जमलेलं नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होणार नाही, असं शिरसाट म्हणाले.
सुनील तटकरेंची झोप उडेल, असा खेळ भरत गोगावलेंनी मांडलाय!
दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात अजूनही 15 जागांचा तिढा सुटला नाही. त्यामुळं वंचित आणि महाविकास आघाडीत आघाडी होणार की, नाही याविषयी शंका आहे. जागेचा तिढा मिटल्याशिवाय वंचितला किती जागा मिळणार हे सांगता येत नाही. त्यामुळं महाविकास आघाडी जागा सोडो अथवा नु सोडो 48 जागांवर लढण्यासाठी आमचे उमदेवार आहे. 27 जागांची पूर्ण तयारी झाले. उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीला मी जाणार आहे. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तिन्ही पक्ष मागे लागले
राज्यातील तीन प्रमुख आणि मोठे पक्ष आम्हाला विचारत नव्हते. हे पहिल्यांदा आघाडीमध्ये आम्हाला घेत नव्हते. मात्र प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘वंचित’ची सव्वादोन लाख मते आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष आम्हाला आघाडीत सामावून घेण्यासाठी आमचे मागे लागल्याचं आंबेडकर म्हणाले.
आंबेडकरांची कॉंग्रेसवर टीका
मविआसोबत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे इच्छुक आहेत. मात्र जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने ते चांगलेच आक्रमक झालेत. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये सुपारीबाज कोण कोण आहेत त्यांची नावे तीन-चार दिवसांनी जाहीर करणार आहे. त्यांची नावंही घ्यायला आम्ही घाबरत नाहीत, असं आंबेडकर म्हणाले.