Sanjay Shirsat On Sanjay Raut : बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish yadav) याच्यावर नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. एल्विश हा गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ (Cm Eknath Shinde) शिंदे यांच्या घरी आला होता. त्यावरून आता मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी घेरले आहे. देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्याला आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चोख प्रत्युत्तर देत राऊतांवरही काही गंभीर आरोप केलेत.
Ahmednagar News : मराठवाड्याला पाणी सोडण्यापूर्वी प्रशासनाकडून ‘या’ भागांमध्ये जमावबंदी…
शिरसाट म्हणाले, आजकाल संजय राऊत यांना लोकांचे काय काय पाहायचे असते? स्वतः राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? हे जर आम्ही बोललो तर, मग तुम्हाला कळेल कोणत्या हॉटेलवर राऊत थांबल्यावर त्यांच्या हॉटेलची बिल कोण भरायचे? जे आज तुमच्या नावाने रडतायत तेच तुमच्या हॉटेलची बिल भरायचे, कृपया राजकारणामध्ये वैयक्तिक गोष्टींवर जाऊन नका, असे आवाहन शिरसाटांनी राऊतांना केले आहे.
मुकेश अंबानींना धमकी देत 400 कोटी मागणारा गजाआड! मुंबई पोलिसांची अटकेपार कामगिरी
ड्रग्ज सेवन कुठेही कुठल्याही खासदाराने केलेले नाही. त्याबद्दल राऊत जे गैरसमज पसरवत आहेत ते चुकीचे आहे. आपले झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर त्याच्या पुराव्यासह उत्तर दिले जाईल. हॉटेलच्या नावासहित रूम नंबर सहित सर्व देऊ शकतो, असे चँलेजच शिरसाट यांनी राऊत यांना दिले आहे.
शिरसाट यांनी राऊतांना जोरदार फटकारले आहे. शिरसाट म्हणाले, राजकारण करत असताना तुम्ही एखाद्यावर टीका करणे, ठीक आहे. पण महाराष्ट्राची बदनामी करू नका हे त्यांना सांगणे आहे.संजय राऊत सध्या पोपटाच्या भूमिकेत आहेत. पहिले ते दलालाच्या भूमिकेत होते. आता पोपटाच्या भूमिकेत आहेत. म्हणून त्याची चिंता आता करू नका. सरकार काही जाणार नाही. त्यांच्याजवळ असलेले 15 आमदार जाणार आहेत. 31 डिसेंबरनंतर त्यांचे 15 आमदार शिवसेनेकडे असतील हे तुम्हाला निश्चित सांगतो.