Download App

राजीनामा म्हणजे पूर्णविराम नव्हे, राष्ट्रपतींच्या माफीनाम्यापर्यंत लढणार; धसांनी सांगितला पुढचा प्लॅन

Suresh Dhas Reaction After Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येचे फोटो काल समोर आलेत. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठ्या प्रमाणात रोष पसरला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलाय. वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याची सोशल मिडिया पोस्ट मुंडेंनी केलीय. यानंतर आता सुरेश धस यांची (Suresh Dhas) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय प्लॅन आहे, याबद्दल सांगितलं आहे.

सुरेश धस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचे आभार मानले. दोन आठवड्यांपूर्वीच अजितदादांनी म्हटलं होतं की, नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. राजीनामा झाला यात आम्ही समाधानी आहोत. आता या प्रकरणात कोणाचा दबाव येणार नाही. सप्लिमेंटरी
चार्जशिट दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर देखील कारवाई होतील. मी अजून आरोप खंडन केलेले नाहीत. 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर खंडणीसंदर्भात बैठक झाली होती. चौकशी अजून आहे. बऱ्याच जणांचा तपास, कॉल रेकॉर्डिंगचा तपास करायचा आहे. काही अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहेत, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बदलांना विरोध; मुंबईत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एकी

सुरेश धस यांनी म्हटलंय की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा एवढंच उत्तर नाहीये. राजीनामा किरकोळ बाब असून सर्वांना फाशी झाली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवणं. या लोकांना संधी न मिळू देणं, 145 साक्षीदार अधिकारी टिकवून ठेवणं मोठी कसरत आहे, असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत.

देशमुख कुटुंब, मस्साजोगचे ग्रामस्थ आणि आम्ही या प्रकरणात धसासा लावू. महादेव मुंडे हत्या प्रकरणाला सहा महिने झाले. तरी देखील अजून प्रकरणाचा तपास नाही. परळीच्या पोलिसांनी गुन्हे सुद्धा दाखल केलेले नाही. कोर्टाने दाखल केलेत. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता परळीचे लोक सुटकेचा निश्वास सोडतील, असं धस यांनी म्हटलंय. आकाच्या मागे आता मोठा आका नसल्यामुळं अनेक लोक आता तक्रार द्यायला येतील, असंही सुरेश धस यांनी म्हटलंय.

Video : मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत पण, मंत्रिपदचं द्यायला नको होतं; पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 15 व्हिडिओ कॉल केले होते. ते कोणाला केले? आकाला फोन केला का, विष्णू चाटे छोटा आका त्याला फोन केला का? सुदर्शन घुले सापडणार, पळून पळून कुठे जाणार? पोलीस त्यांना 100 टक्के पकडणार, असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केलाय. ही लढाई संपनार नाहीये. राजीनामा राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहणार, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us