Video : मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत पण, मंत्रिपदचं द्यायला नको होतं; पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर

Pankaja Munde On Dhananjay Munde Resignation : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीमाना दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा आधीच दिला पाहिजे होता. राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घ्यायला नको होती. अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, काल काही व्हिडिओज सोशल मीडिया वरती व्हायरल झाले होते, संतोष देशमुख यांच्या हत्येचे ते व्हिडिओ होते. ते व्हिडिओ उघडून पाहण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. ज्या लोकांनी संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ केला आहे. त्या लोकांमध्ये एवढी निर्मनुष्यता आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे. हे व्हिडिओ बघण्याची सुद्धा माझी हिम्मत झाली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, त्यात मी माझी भूमिका मांडली होती. या हत्येमध्ये कोण इनवॉल आहे? कोणाकोणाचा हात आहे? हे फक्त तपास यंत्रणांना माहीत आहे. मी यात हस्तक्षेप करण्याचा काही संबंध नाही. ज्या मुलांनी ही हत्या केलेली आहे, त्या मुलांमुळे संपूर्ण राज्यातील समाज ज्यांचा कुठलाही दोष नाही, त्यांची बदनामी झाली आहे. संतोष देशमुख यांचा समाज सुद्दा आक्रोशात वावरत आहे. आपल्या राज्यात कुठलीही गोष्ट जातीवर जाते. अमानुषपणे एखाद्याला संपवणाऱ्या आणि हल्ला करणाऱ्या लोकांना कुठलीही जात नसते.
गुन्हेगारांना जशी कुठली जात नसते तशीच राजकारण्यांना सुद्धा कुठली जात नसते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी आमदारकीची शपथ घेतली, तेव्हाच कोणाबद्दल आक्रोश बाळगणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे याही प्रकरणात कुठलाही जातीवाद होण्याचा प्रयत्न होऊ नये. मी संतोष देशमुख यांच्या आईची आणि कुटुंबीयांची हात जोडून माफी मागते. या प्रकरणातल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे. असं नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या.
माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे स्वागत आहे. पण हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. राजीनामा पेक्षा त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधीच राजीनामा घ्यायला पाहिजे होता. त्यामुळे हे सर्व पुढे झालं नसतं. असं मतं माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी मांडलं.
औरंगजेब मुद्द्यावर सत्ताधारी आक्रमक; विरोधकांना पायऱ्यांवर जागा मिळाली नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोशल मीडियावर 3 मार्च रोजी फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली होती अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीत धनंजय मुंडे यांना राजीमाना देण्याचे आदेश देण्यात आले असं देखील बोललं जात आहे.