Download App

‘अजित पवारांच बंड हे स्वार्थासाठी…’; शालिनीताई पाटलांची सडकून टीका

  • Written By: Last Updated:

Shalinitai Patil on Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी केल्यानं राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार हे स्वत: सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. यावरूनच शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं. अजित पवारांचं बंड हे स्वार्थासाठी होतं. उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासााठी होतं, अशी टीका शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी केली.

”कुबड्यावर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा” 

शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं वारंवार सांगितल्या जातं. राजकीय विरोधकांकडून तर या मुद्द्यावरून पवारांवर सातत्याने टीका केली जाते. काल बारामती येथील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली. मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी वयाच्या 38 व्या वर्षीच वसंत दादांना मागं सारलं, असा टोला अजित दादांनी लगावला. दरम्यान, आज शालिनीताई पाटील यांना अजित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली.

नागपुरात फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट! चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी 

शरद पवार आणि अजित पवारांच्या बंडामध्ये काय फरक आहे, या प्रश्नावर बोलतांना शालिनीताई म्हणाल्या की, शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शरद पवारांचं बंड हे आपल्या पक्षातील आमदार दुसरीकडे जाऊ नयेत, यासाठी होतं. तर अजित पवराांच बंड हे स्वार्थासठी होतं. उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासााठी अजित पवारांचं बंड होतं, अशी टीका शालिनीताई पाटील यांनी केलं.

पुढं बोलतांना शालिनाताई म्हणाल्या की, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील. जो माणूस सख्ख्या चुलत्याचा, ज्याने लहानानं मोठं केलं त्यांचा विश्वासघात करतो, त्याच्यचावर विश्वास का ठेवावा? अजित पवारांवर कुणाही विश्वास ठेवणार नाही. अजित पवारांसोबत गेलेली माणसं कोणत्या लायकीची आहेत, हे मी अनेकदा सांगतिलं. त्यात बाकी जे आमदार आहेत, ते पुन्हा शरद पवारांकडे जातील, असंही शालिनीताई पाटील म्हणाल्या.

त्या म्हणाल्या १०५ कोटींचा भ्रष्टाचार केलेला हा माणूस आहे. अंतुलेसारखी अवस्था होईल. अंतुलेंनी मुख्यमंत्री असतांना स्वत:चा ट्रस्ट केला केला होता. वैयक्तिक ५ कोटींचा फायदा घेलता. हे इंदिराजींना सांगिलल्यावअंतुलेंना पायउतार होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अंतुलें विरोधात खटला उभा झाला. हे सर्व मी केलं. ५ कोटींसाठी एका मुख्यमंत्र्यांची वाट लावली. हा तर १०५ कोटींचा भ्रष्टाचार आहे, सिंचनाताील हा घोटाळा आहे, असंही शालिनीताई म्हणाल्या.

Tags

follow us