नागपुरात फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट! चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

  • Written By: Published:
नागपुरात फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट! चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

Nagpur Balloon Cylinder Explosion : राज्यात एकीकडे ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असतांना दुसरीकडे नागपुरात एक भयानक घटना घडली. नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट होऊन चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नागपुरातील जुन्या व्हीसीए ग्राऊंड परिसरात ही घटना घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण बॅनर्जींकडून धनखड यांची पुन्हा मिमिक्री, म्हणाले, ‘मला तुरुंगात टाका, पण मी मिमिक्री करणार…’ 

सिजान आसिफ शेख असे मृत मुलाचे नाव असून तो चार वर्षांचा आहे. फरिया हबीब शेख (वय 28 वर्षे), अनमता हबीब शेख (वय 24 वर्षे) अशी या स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, ख्रिसमस असल्याने व्हीसीए परिसरातील चर्चसमोर खरेदीसाठी अनेक दुकाने लावण्यात येतात. तिथे गॅस फुगे विकणारा एक व्यक्तीही आला होता. या ठिकाणी बरीच वर्दळ होती. ख्रिसममच्या सुट्ट्या असल्यानं सिजानही व्हीसीए मैदनावर आपल्या मावशीसह आला होता. फुगेवाला दिसताच सिजानने मावशीकडे फुगे घेण्याचा आग्रह केला. त्यानंतर तो फुगे घेण्यासाठी फुगेवाल्याकडे गेला. फुगा फुगवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलिंडर उंच हवेत उडला. आग लागल्यानं सिजान गंभीर जखमी झाला. तर काही अंतरावर असलेली त्याची मावशीही गंभीर जखमी झाली.

Girija Prabhu : गिरीजा प्रभूची हसरी स्माईल, चाहते फिदा 

दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सिजान आणि जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केलं. सिजानला तपासून डॉक्टरांनी त्याला म़ृत घोषित केलं. तर सध्या दोन जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सांगितले की, फुगेवाला हा सातत्याने नागपूर शहरात फुगे विकत होता. मात्र त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. घटनेनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. आम्ही फुगे विक्रेत्याचा शोध घेत आहोत. अद्याप स्फोटाचं कारण अद्याप समोर आलं नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube