कल्याण बॅनर्जींकडून धनखड यांची पुन्हा मिमिक्री, म्हणाले, ‘मला तुरुंगात टाका, पण मी मिमिक्री करणार…’
Kalyan Banerjee mimicry : उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची मिमिक्री करून करून वाद निर्माण करणारे TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रविवारी पुन्हा एकदा धनखड यांची मिमिक्री केली. बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी धनखड यांची पुन्हा एकाद मिमिक्री केल्याचा प्रकार समोर आला. या कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
Israel–Hamas War : इस्त्रायलकडून हल्ले सुरूच, गाझापट्टीत बॉम्बवर्षाव, 166 जणांचा मृत्यू
संसदेच्या सुरक्षा भंगावरून लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ केल्यानं 41 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शने केली होती. यावेळी कल्याणी बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अशातच काल त्यांनी पुन्हा एकदा धनखड यांची मिमिक्री केली. यावेळी बोलतांना बोलतांना बॅनर्जी यांनी सांगितले की, मी मिमिक्री ही कला आहे. त्यामुळं मी मिमिक्री करत राहणार. मिमिक्री हा मूलभूत अधिकार आहे. मी हे एकदा नाही तर हजार वेळा करेन. गरज पडल्यास भविष्यातही मी हे करेन. मला माझे मत मांडण्याचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. तुम्ही मला तुरूंगात टाकू शकता, मला मारू शकता. पण, ही लढाई आता थांबणार नाही, असं बॅनर्जी म्हणाले.
Girija Prabhu : गिरीजा प्रभूची हसरी स्माईल, चाहते फिदा
ते म्हणाले, निषेध करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, या पध्दतीमध्ये विनोद सांगण्यापासून ते गाणे गाण्यापर्यंतचा समावेश आहे, असंही बॅनर्जींनी सांगितलं.
बॅनर्जींनी पहिल्यांदा मिमिक्री केली तेव्हा धनखड यांनी आपण शेतकऱ्याचा मुलगा असल्याचं म्हटलं आहे. यावरही बॅनर्जींनी भाष्य केलं. ते म्हणाले, धनखड यांची जोधपूरमध्ये कोटींची मालमत्ता आहे. दिल्लीत आलिशान फ्लॅट आहे. ते दररोज लाखो रुपयांचा सूट घालतात, असा दावाही बॅनर्जींनी केला.
यावेळी बॅनर्जींनी संसद संसदेचा भंग झाल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. बॅनजी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी इतिहासाच्या पानात आपले नाव लिहिण्यासाठी घाईघाईने संसदेची नवीन इमारत बांधली, परंतु त्या बदल्यात त्यांनी खासदारांच्या सुरक्षेशी तडजोड केली. भाजपच्या एका खासदाराने त्या दोन तरुणांना पास दिले होते. त्याा वाचवण्यासाटी विरोधी पक्षाच्या 146 खासदारांना निलंबन करण्यात आलं, अशी टीका बॅनर्जींनी केली.