‘समोरसमोर चर्चा करू, मी महायुतीकडून येतो, तुम्ही…’; शंभूराज देसाईंचं पृथ्वाराज चव्हाणांना ओपन चॅलेंज

पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला असेल तर मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे, मी महायुतीकडून येतो. त्यांनी मविआकडून यावं.

Shambhuraj Desai

Shambhuraj Desai

Satara Politics : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) आव्हान दिलं. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानावरून चव्हाण यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. त्यावरून आता महायुतीकडून (Mahayuti) मी समोरसमोर येऊन चर्चा करायला तयार आहे, पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीकडून यावं, असं आव्हाण देसाईंनी दिलं.

कुराण वाचा, अरबी शिका अन् इस्लामला जाणून घ्या; नेतान्याहूचा नवा आदेश 

शंभूराज देसाईंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी चव्हाण यांनी वाढलेल्या टक्केवारीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. त्याविषयी मंत्री देसाईंना विचारले असता ते म्हणाले, माझ्या पाटण मतदारसंघातील अनेक मतदार मुंबईहून आले होते. त्यांना मुंबईहून यायला उशीर झाला होता, त्यामुळे मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढली. पण, शेवटच्या तासात मतदानाची आकडेवारी म्हणजे ते बोगस मतदान झाले, असं म्हणणं चुकीचं आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, विजय वाटेगावकर, रणजित पाटील, सुलोचना पवार आदी उपस्थित होते.

पुढं देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे जे १०-१२ आमदार निवडून आले आहेत, त्यात कोणताही घोटाळा झाला नाही आणि महायुतीचे जे दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत, त्यात घोटाळा झाला, असं म्हणणं चुकीचं आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तसा आरोप केला असेल तर मी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे. मी महायुतीकडून येतो. त्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने चर्चेसाठी यावे, असं चॅलेंज देसाईंनी दिलं.

ठाकरे यांच्या मराठी सक्तीचा मोठा धाक, अमराठी व्यापारी शिकायला लागले मराठी बाराखडी 

आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीविषयी विचारले असता देसाई म्हणाले, आमदार निवासात राहायला असताना मीही तिथल्या जेवणाच्या दर्जाबद्दल तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीनंतर जेवणाच्या दर्जात सुधारणा व्हायलाच पाहिजे. शिरसाट कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जाबद्दल जे बोलले त्यात तथ्य आहेत. मात्र, त्यांनी मारहाण न करता तक्रार करायला हवी होती. मारहाण करणे चुकीचे आहे, असं देसाई म्हणाले.

Exit mobile version