Sharad Pawar : आज (11 जानेवारी) शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत की, अजित पवार शरद पवारांसोबत एकत्र येणार की गेल्या दोन वेळांप्रमाणे अजित पवार कार्यक्रमांना जाणं टाळणार. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात हे दोन नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला मणिपूर सरकारची परवानगी पण…
पुण्यामध्ये वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेला महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित अनेक नेते आणि उद्योजक यांची उपस्थिती असेल. या सभेमध्ये साखर उद्योगासाठी काय-काय धोरण असावीत यावर चर्चा होणार असून वर्षभरात उत्तम कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
Sunil Kedar यांना सुटकेचा जल्लोष भोवला; केदार यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
याच कार्यक्रमामध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शरद पवार हे व्हीएसआयचे अध्यक्ष आहेत. तर अजित पवार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. तर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हे व्हीएसआयचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान नुकतच अजित पवार यांनी दोनदा शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणे टाळलं होतं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात हे दोन नेते एकाच व्यासपीठावर दिसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र या सभेचं महत्त्व पाहता शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. कारण आता पर्यंत या सभेला सर्व साखर उद्योगाशी सबंधित लोक या सभेला उपस्थित राहतात. कार्यक्रमाच्या अगोदर या सर्व कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावर अजित पवार यांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं होतं.