शरद पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकाच व्यासपीठावर; राजकीय वर्तुळात चर्चा

शरद पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा एकाच व्यासपीठावर; राजकीय वर्तुळात चर्चा

नुकत्याचं पुण्यात झालेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं, त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत. येत्या रविवारी सोलापुरमधील सांगोल्यात एका कार्यक्रमात शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे आता या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार? एकमेकांविषयी काय बोलतील? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राहुल गांधी यांची हुजरेगिरी करण्यासाठी संजय राऊत हाजीर; संजय शिरसाट यांची बोचरी टीका

सांगोल्याचे माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळ येत्या रविवार पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवारांसह देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर सलग दुसऱ्यांदा दोन्ही नेते एकमेकांना सामोरे जाणार आहेत. पुण्यात झालेल्या कार्यक्रमातही देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी, शरद पवार, अजित पवार एकनाथ शिंदे एकाच मंचावर पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता या दुसऱ्या कार्यक्रमातही शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकत्र दिसून येणार आहेत.

भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस; तक्रार दाखल करत तुषार गांधींचा आरोप

शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा मोठा गटही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाला आहे. आता काँग्रेसही फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत.

बांग्लादेशचा कर्णधार ठरला! शाकिब अल हसनच्या खांद्यावर धुरा; विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व करणार

शरद पवारांना युतीत सामिल करुन घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहेत. त्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रण निर्माण होत असल्याचं दिसून येतंय. मात्र, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आपण कुठल्याही परिस्थिती भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणातले दोन कट्टर विरोधक एकमेकांसमोर एकाच मंचावर येत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष याकडं असणार आहेे. एरवी एकमेकांकडून टीका-टीप्पण्या, आरोप-प्रत्योरोप सुरु असतात. आता या कार्यक्रमात दोन्ही एकत्र येणार असल्याने एकमेकांविषयी कार्यक्रमात काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube