भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस; तक्रार दाखल करत तुषार गांधींचा आरोप

Sambhaji Bhide

Tushar Gandhi on Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महात्मा गांधी आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी भिडे यांच्यासह संभाजी भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस आहे. असं म्हणत भाजपवर देखील निशाणा साधला आहे. (M K Gandhi Great Grandson Tushar Gandhi Filed case on Sambhaji Bhide )

डॉक्टरांची गैरहजेरी गर्भवतीच्या जीवावर बेतली; वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस…
तुषार गांधी यांनी भिडे यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत वकिल असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार विश्वंभर चौधरी आणि अन्वर राजन हे देखील होते. यावेळी तुषार गांधी यांनी भिंडेसह बाजपवर निशाणा साधला.

OMG 2: लैंगिक शिक्षणाबद्दल मुलांशी संवाद? पंकज त्रिपाठीनी थेटच सांगितले; म्हणाले… 

ते म्हणाले, संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यक्रमाबाबत आम्ही तक्रार नोंदवली आहे. बापू हे पब्लिक फिगर आहेत. त्याचवर टीका टीपणी होते. पण या माणसाने पुढे जाऊन बापूंच्या आई आणि वडिलांवर टीका केली. आमचा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते की, भिडेंवर कडक कारवाई करणार. पण 1 महिना झाला अजून काहीच कारवाई झाली नाही.

तसेच उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये एक बोलतात आणि सभागृहाच्या बाहेर दुसरा बोलतात. तर संभाजी भिडे यांची हिंमतच नाहीये अशा पद्धतीने बोलायची. हे ते स्वतः बोलत नाहीत. त्यांचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस आहे. असं म्हणत तुषार गांधींनी भिडे यांच्यासह भाजपवर देखील निशाणा साधला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube