OMG 2: लैंगिक शिक्षणाबद्दल मुलांशी संवाद? पंकज त्रिपाठीनी थेटच सांगितले; म्हणाले…
Pankaj Tripathi on Sex Education: लैंगिक शिक्षण हे मुलांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात असते. यामधून आपली लैंगिक ओळख नेमकी काय? हा संवेदनशील सवाल देखील करणे पालकांसाठी गरजेचे असते. या विषयाबद्दल आपल्या पाल्याची कुंचबणा होता काम नये. याची खरी काळजी घेण्याचे महत्वाचे आहे. आपल्या मुलांबरोबर हा संवाद असणे देखील खूप महत्त्वाचे असते. सध्या सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. ती म्हणजे खिलाडीच्या ‘OMG 2’ या सिनेमाची. हा सिनेमा ११ ऑगस्टला चाहत्यांच्या भेटीला येत आहे. यामधून या सिनेमासाठी एडव्हान्स बुकींग होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर एक चांगलीच चर्चा रंगत असलयाचे पाहायला मिळत होते. ती म्हणजे लैंगिक शिक्षणाची. यामुळे हा सिनेमा त्यावर आधारित आहे का अशी देखील चर्चा रंगत असलयाचे पाहायला मिळत होते. तसेच मध्यतंरी सद्गुरू यांनी देखील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. यामुळे तरूण मुलं आणि त्यांचे लैंगिक शिक्षण हा विषयी परत एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमातून पंकज त्रिपाठीसोबत अभिनेता खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार हा हटक्या अंदाजात दिसून येणार आहे. यामुळे त्यांची देखील जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळत आहे. सध्या तेही या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या मुलीशी ते लैंगिक संबंध आणि लैंगिक शिक्षण यांच्याविषयी बोलता का? यावर देखील त्याने थेटच सांगितले आहे. ‘इंडिया फॉरम्स’शी बोलत असताना त्यांनी याबद्दल खुलासा केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना आज देखील लैंगिक शिक्षणाबद्दल बोलत असताना पालकांमध्ये आणि त्यांच्या मुलात संकोचलेपणा असतो, तेव्हा तुम्ही हा विषय आपल्या मुलीबरोबर बोला आहात का? असा सवाल करण्यात आला. यावेळी त्यांनी या मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, ‘आपल्या देशातील कुटुंबामध्ये हा विषय मन मोकळेपणानं बोला जात नाही, त्याचबरोबर मला असं वाटतं की असं होऊ नये. माझ्या मुलीशी माझे नातं खूप जवळचं आहे.
Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…
यामुळे मी तिच्याबरोबर हा विषय चर्चिला आहे. तसेच पुढे म्हणतात की, ”त्यासाठी मला वाटतं आहे की ‘ओह माय गोड 2’ ही एक महत्त्वाची फिल्म ठरणार आहे. यामुळे किमान आम्ही त्या विषयावर बोलायला सुरूवात तरी केली आहे. तसेच आपल्या मुलांबरोबर हा सिनेमा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या ओएमजीमध्ये या सिनेमात देखील कोर्ट रूम ड्रामा बघायला मिळाले होते. या सिनेमात देखील शेवटही सेक्स एजूकेशवर असल्याचे पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, यामी गौतम यांची मुख्य भुमिका पाहायला मिळणार आहे, तर अरूण गोविल, गोविंद नामदेव, फहिम फाजिल, कबीर सदानंद यांच्याही महत्त्वाच्या भुमिका आहेत. हा सिनेमा 11 ऑगस्ट या दिवशी प्रदर्शित होणार आहे.