Download App

पवार आणि मुंडे यांच्यात संवाद : ढाकणे कोणता निरोप घेऊन आले होते?

  • Written By: Last Updated:

पुणेः ऊसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली. मात्र या लवादाची बैठक निमित्त होते. त्यात काही राजकारण शिजत असल्याचे चित्र होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व भाजप (bjp) नेते पंकजा मुंडे यांचा संवाद घडला. या संवाद घडण्यासाठी दुवा ठरले ते नगरचे नेते प्रताप ढाकणे.

‘राम मांसाहारी’ आव्हाडांच्या विधानावर राष्ट्रवादीने मौन सोडलं; म्हणाले, पक्षाचं..,

गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा देखील चर्चा काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आल्या होत्या. मुंडे-पवार संवाद अशीच घटना पुण्यामध्ये घडलेली पाहायला मिळाली. याचे कारण म्हणजे ऊसतोड कामगारांची बैठक. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना आवर्जून एक मिनिट बाजूला घेऊन हितगुज साधला आहे. याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट बरेच काही सांगून जाते. बैठक झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रताप ढाकणे यांच्यामध्ये झालेली चर्चा ही शरद पवार यांचा निरोप होता का ? अशी चर्चा या निमित्ताने आता सुरू झाली आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यात तथ्य असू शकतं…’


मुंडे-ढाकणे यांची जवळीक नव्या राजकारणाची नांदी?

एकीकडे पंकजा मुंडे पाथर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या चर्चा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप ढाकणे हे पाथर्डी-शेवगावचे उमेदवार आहेत त्यामुळे मुंडे-ढाकणे यांची जवळीक ही राज्यातील एक नव्या राजकारणाची नांदी ठरू शकते. पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी आपण भाजपवर नाराज नसल्याचे बोलून दाखवलेली आहे. मात्र दुसरीकडे त्यांची गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्याशी असलेली जवळीक ही काही लपून राहिलेली नाही. अशातच मुंडे-पवार यांच्या संवादाचा दुवा आता प्रताप ढाकणे ठरत आहेत. तर पाथर्डीच्या भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची फडणवीस यांच्याशी वाढलेली जवळीक पाहता प्रताप ढाकणे आणि पंकजा मुंडे यांच्यातील चर्चा ही ढाकणे यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. तर पंकजा मुंडे यांची राष्ट्रवादीची जवळी देखील या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे.

follow us