‘राम मांसाहारी’ आव्हाडांच्या विधानावर राष्ट्रवादीने मौन सोडलं; म्हणाले, पक्षाचं..,

‘राम मांसाहारी’ आव्हाडांच्या विधानावर राष्ट्रवादीने मौन सोडलं; म्हणाले, पक्षाचं..,

NCP News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील कार्यक्रमात प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं. राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून आव्हाडांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केलायं. मात्र, यावर आत्तापर्यंत शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती मात्र, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत फारकत घेतली आहे.

प्रभू राम हे तमाम देशवासियांचे श्रद्धास्थान असून जितेंद्र आव्हाडांचं विधान हे त्यांच व्यक्तिगत मत असू शकतं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नसल्याचं म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर फारकत घेतली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान खुद्द आव्हाडांच असून पक्षाचं नसल्याची भूमिकाच राष्ट्रवादीकडून मांडण्यात आली आहे.

‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप

शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सर्वच दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून अनेक नेत्यांनी मार्गदर्शनपर भाषण केल्याचं पाहायला मिळालं. याचदरम्यान, जितेंद्र आव्हाड भाषण करीत होते. भाषणादरम्यान, भाजप आणि शिंदे गटावर त्यांचा चांगलाच तोल जात होता.

फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही ‘त्या’ दिवसाची…”

येत्या काही दिवसांत अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, राम आपला, बहुजनांचा. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात, पण आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

आव्हाडांनी रामाबद्दलचं हे विधान केल्यानंतर त्यांना माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड आपल्या विधानावर ठाम असल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नसून मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनवलं जातयं, पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? देशातील 80 टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त असल्याची भूमिका आव्हाडांनी मांडली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube