Ahmednagar News : जिल्ह्यावर पुन्हा पकड बनवण्यासाठी शिर्डीत शिबीर; शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू

Ahmednagar News : जिल्ह्यावर पुन्हा पकड बनवण्यासाठी शिर्डीत शिबीर; शरद पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) पुन्हा पकड बनवण्यासाठी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) पाऊले उचलण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी शिर्डी येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय शिबिर पार पडणार आहे. दरम्यान आगामी काळात असणाऱ्या लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून तयारी सुरु असल्याच्या चर्चा देखील यामाध्यमातून समोर येऊ लागल्या आहेत. तर आगामी काळात राज्यात लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानुषंगाने आता राजकीय पक्षांकडून देखील हालचाली सुरु करण्यात आलेल्या आहेत.

केजरीवालांच्या अडचणीत वाढ, औषध घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिले CBI चौकशीचे आदेश

महाराष्ट्र प्रदेश नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीच्या वतीने २ दिवसाचे शिर्डी येथे “ ज्योत निष्ठेची – लोकशाहीच्या संरक्षणाची ” शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या शिबिरात सध्याची राजकीय परिस्थिती, तसेच शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, उद्योजकांचे हाल व सरकारला विसर पडलेली लोकशाही मूल्य व सध्या संविधानाचे होत असलेले अवमूल्यन या संबंधीच्या विविध विषयांवर भाष्य केले जाणार आहे. तसेच याप्रसंगी चर्चा देखील केली जाणार आहे.

31 December 2023 Deadline : 31 डिसेंबरपूर्वी ‘हे’ काम करा, अन्यथा सहन करावा लागेल मोठा तोटा…

तसेच आगामी काळात निवडणुका या होणार असल्याने यासाठी देखील पक्षाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पक्षसंघटनेचे सक्षमीकरण, येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी करावे लागणारे नियोजन या विविध विषयांवर विचारांचे मंथन होणार आहे. विशेष म्हणजे या शिबिराला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः उपस्थित राहणार आहे. त्यांच्याबरोबर अनेक दिग्गज नेते हे शिर्डीमध्ये दाखल होणार आहे. यामुळे निवडणुकांच्या अनुषंगाने या शिबिराला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube