राज ठाकरे म्हणजे मिमिक्री आर्टिस्ट, त्यांनी आपला पक्ष सांभाळावा; राज ठाकरेंच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मी मानतचच नाही. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली […]

Jitendra Awhad

Jitendra Awhad

Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मी मानतचच नाही. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली ती मोळी आहे, अशी टीका त्यांनी केली. शरद पवार आणि अजित पवार हे आतून एकच असल्याचा दावाही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

उद्धव ठाकरे मोदी-शाह जोडीला खत्रूड म्हणतात… पण त्यांनी तर जुन्या दोस्तांनाही जिंकलं आहे… 

आज माध्यमांशी बोलतांना जितेंद्र आव्हाड यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणााले की, वर्षभरात 50 वेळा राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चहा प्यायला गेले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, अशी टीका आव्हाडांनी केली. राज ठाकरे हे स्वत:च नाटक कंपनी आणि मिमिक्री आर्टिस्ट आहेत, त्यामुळे ते कोणाचीही नक्कल करु शकतात. स्वत:चा पक्ष वाढवायचं सोडूनु दुसऱ्याच्या पक्षात काय सुरु आहे कशाला बघताय?, असं सवाल आव्हाडांनी केला.

Sanki: अहान शेट्टीसोबत रोमान्स करताना दिसणार पूजा हेगडे, आगामी सिनेमाची केली घोषणा 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, आम्ही खुलेआम सांगतो आहोत आमच्यातून गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही. आम्ही आमचे सर्व दरवाजे बंद केले आहेत. घरं तुटलं तरी चालेल, पण मी विचारांवर ठाम आहे. माझा निर्णय बदलणार नाही, असा जो माणूस सांगतो, ते पवार साहेब सोडून गेलेल्यांना पक्षात कशाला घेतील? शरद पवार अतिशय जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतून बाहेर पडले. राज ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळावा, मोळी बांधली की चोळी बांधली आहे. आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं सल्ला आव्हाडांनी दिला.

आव्हाड म्हणाले, शरद पवारांची विचारधारा काय आहे? हे त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवून दिलं आहे. त्याचं अख्खे घर तुटलंय. अजित पवार एकीकडे, सुप्रीया सुळे एकीकडे आणि शरद पवार एकीकडे गेले. शरद पवार यांनी हे नाही पाहिले की त्यांचे घर तुटते आहे, त्यांनी सांगितले मी जातीवादी शक्तींसोबत जाणार नाही. रोज सकाळी 7 माणसे त्यांच्या घरी जाऊन बसायचे आणि बोलायचे भाजपात जाऊ असं साहेबांना सांगायचे. मात्र, पवारांनी कधीच होकार दिला नाही. पण नकार त्यांनी असा दिला की ते इतिहासात नमूद होईल.शरद पवार यांनी आपले घर कोसळताना पाहिले पण आपली विचारधारा सोडली नाही

दरम्यान, आव्हाडांनी केलेल्या टीकेला आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.

Exit mobile version