Download App

ईव्हीएम मशीन खराब झाल्यावर भाजपला मतदान; सिब्बल यांचा खळबळजनक आरोप

देशातील प्रमुख विरोधी पक्षांची काल बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल ही बैठक घेण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, कपिल सिब्बल यांच्यासह इतरही पक्षांचे नेते उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी ईव्हीएमवर आरोप केला आहे.

ज्या-ज्या ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला त्या ठिकाणी भाजपला मते मिळाली आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. अमेरिकेमध्ये देखील आता ईव्हीएमचा वापर बंद आहे. भारतात ईव्हीएमचा हट्ट का असे सिब्बल म्हणाले आहेत.

स्कूल बस असोसिएशनच्या निर्णयाने पालकांच्या खिशाला झळ बसणार…

ईव्हीम मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर भाजपला मदत होते हा भ्रम फक्त राजकीय पक्षांपुरता मर्यादित नसून हा भ्रम सामान्य लोकांमध्ये देखील झाला आहे. यावर अद्याप निवडणून आयोगाने काहीही उत्तर दिलेले नाही. आम्ही निवडणूक आयोगाशी याबाबतीत चर्चा करणार आहोत. आम्ही आधी देखील अनेकद्या त्यांच्याकडे गेलो आहोत. आता शेवटचे त्यांना विचारणार आहोत की, तुम्ही याबाबत काय करणार आहात, असे सिब्बल म्हणाले आहेत.

आम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्याचे तुम्ही आम्हाला लेखी उत्तर पाहिजे आहे. जर त्यांनी आम्हाला याचे उत्तर नाही दिले तर आम्ही सर्व राजकीय पक्ष यावर विचार करु की पुढे काय करायचे. तसेच युरोप, अमेरिका, जर्मनी या कोणत्याही देशात ईव्हीएमचा वापर होत नाही, मग आमच्याच देशात का केला जातो, असे म्हणत सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

उत्तर कोरियाने केली नव्या ड्रोनची निर्मिती; पाण्याखाली आणता येणार त्सुनामी

दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली होती. यामध्ये आगामी 2024 च्या निवडणुकीतसाठी भाजपला कसे यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच विरोधकांकडून 2024च्या लोकसभेसाठी महागठबंधन करण्याची तयारी सुरु आहे.

Tags

follow us