स्कूल बस असोसिएशनच्या निर्णयाने पालकांच्या खिशाला झळ बसणार…

स्कूल बस असोसिएशनच्या निर्णयाने पालकांच्या खिशाला झळ बसणार…

School Bus Fees : नवीन शैक्षणिक वर्षांत पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस शुल्क वाढणार आहे. राज्यातील सर्वच स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे.

थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’

सरकारकडून जून्या गाड्या भंगारात काढणार असून पुढील महिन्यांत नवीन प्रदुषण नियमांनूसार वाहने अपग्रेड करावी लागणार आहेत. त्यामुळे आमच्यावर आणखीनच अर्थिक ताण येणार असल्याने स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्कूल बस असोसिएशनने स्पष्ट केलं आहे.

एकीकडे दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याने राज्यातील जनतेसमोर एक आव्हान उभं असतानाच आता स्कूल बस असोसिएशनकडून शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता नव्या शैक्षणिक वर्षांत पालकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत, चंद्रपुरात खळबळ

राज्य सरकारने नवे धोरण आखल्याने स्कूल बसच्या शुल्कात ही वाढ करण्यात आली असून आहे. सरकारच्या नव्या धोरणानंतर आता बस उत्पादक कंपन्यांकडूनही गाड्यांच्या दरात चांगलीच वाढ करण्यात येत आहे. जवळपास 2 लाखांवर ही वाढ कंपन्यांनी केली आहे. त्यामुळे नव्या स्कूल बस आता 28 लाखांवर पोहचल्यात. तर मिनी बसची 21 रुपयांना असणार असल्याची माहिती स्कूल बस असोसिएशन दिली आहे.

स्कूल बरोबरच आता ड्रायव्हरच्याही पगारांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास अडीच ते तीन हजार रुपयांनी ड्रायव्हरच्या पगारांत वाढ करण्यात आलीय. त्यासोबदत पार्किंसाठी मोठा दंडही भरावा लागत असून आम्हालाही वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube