Download App

शरद पवारांनी शेळकेंना दम भरताच फडणवीसांचा सल्ला; म्हणाले, धमकी..,

Devendra Fadnvis News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी कार्यकर्त्यांना धमकावल्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शेळकेंना कडक शब्दांत दम भरला आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनीही उडी घेतली असून शरद पवारांनी विधानाचा पुनर्विचार करावा, असा सल्लाच फडणवीसांनी दिला आहे.

BRSचा जोर ओसरला; महाराष्ट्रात ‘पक्षाचे काम सुरु ठेवायचे की बंद करायचे?’ विचारण्याची नेत्यांवर वेळ

नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशातच शरद पवार यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला कार्यकर्त्यांनी जाऊ नये, अशी धमकी अजितदादा गटाचे आमदार सुनिल शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचं शरद पवारांना समजलं. त्यानंतर शरद पवार यांनी थेट सुनिल शेळकेंना शिवराळ भाषेत दम दिला आहे.
एकदा तू दमदाटी केलीस आता बस्स, पुन्हा असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, मी त्या रस्त्याने जात नाही पण अशी स्थिती कोणी निर्माण केली तर मी सोडत नाही, या शब्दांत शरद पवार यांनी एक प्रकारे दमच दिला आहे.

हॅलो ‘आयरिस’ मॅडम! आता केरळच्या विद्यार्थ्यांना शिकवणार पहिली एआय शिक्षिका; काय आहे खासियत?

सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया काय?
शरद पवार आमचे श्रद्धेय आहेत, उद्या देखील राहतील. पण साहेबांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं. मागील ५० ते ५५ वर्षांचा राजकीय इतिहास पाहिला तर साहेबांनी कुठल्याही पदाधिकाऱ्यावर टीका केली नाही. विरोधकांवर देखील व्यक्तिगत टीका केली नाही. पण साहेबांनी माझ्याबद्दल असं वक्तव्य केलं याचं मला आश्चर्य वाटतंय, असंही आमदार सुनिल शेळके यावेळी म्हणाले. आपण शरद पवार यांना भेटणार असल्याचं आमदार शेळके यांनी स्पष्ट केलं.

तसेच मी साहेबांना भेटणार असून त्यांनी मी कोणच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झाली ते सांगावं. मी कार्यकर्त्यांना दम दिला ही माहिती ज्यांनी दिली ती खरी की खोटी दिली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं. साहेबांनी केलेल्या वक्तव्याची मी दखल घेणार. पुढील आठ दिवसात मी दम दिला असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा आणि पुराव्यानिशी माहिती द्यावी, अन्यथा मी राज्यभर सांगणार की मावळ तालुक्यात येऊन शरद पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले असल्याचा दावा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

follow us