Sharad Pawar : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ आणि सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली.
शिवरायांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रात दंगली कशा झाल्या नाही; चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य…
शरद पवार पुढे म्हणाले, मालवणमध्ये घडलेल्या घटनेचा सकाळी आम्ही निषेध केला, अनेक लोक उपस्थित होते. ही अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. 1960 मध्ये यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर पुतळा बसवण्यात आला, त्याला अजून काहीही झालेलं नाही, पण यांनी उभारलेला पुतळा 6 महिन्यातच पडला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनलाला आलं कोण तर मोदी… त्यांचा हात जिथं लागतोय, तिथं काहीतरी उलंट सुलटं होतं, अशी टीका शरद पवारांनी केली.
पुढं ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितले की सावरकर यांची माफी मागण्यात आला नाही. आता विषय काय आहे? लोकांची अस्वस्था काय? आणि हे काय बोलत आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का? ज्यांनी रयतेचं राज्य आणलं, त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात, हे देशाने पाहिलं, असंही शरद पवार म्हणाले.
मला माझ्या बोटांची चिंता
शरद पवार म्हणाले, हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत. शरद पवार आणि माझे चांगले संबंध आहेत, असे नरेंद्र मोदी सांगतात. त्यांनी असंही म्हटलं की, मी पवार साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो. आजकाल जी परिस्थिती आहे, त्यातून मला माझ्या बोटाचा काळजी वाटतेय. आपलं बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं, ते आता दिसतंय, असं म्हणत पवारांनी मोदींवर टीका केली.
देशातील मुस्लिमांबाबत चिंता शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. दारिद्र्यरेषेखालील मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करता येणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.