मोठी बातमी; शरद पवारांची 15 दिवसांत दुसऱ्यांदा प्रकृती खालावली; रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले दाखल

काहीसा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Untitled Design 87

Untitled Design 87

Sharad Pawar’s health condition has deteriorated again : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातील ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. काहीसा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता.

त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सलाईनद्वारे उपचार दिले जाणार असून, अशक्तपणा वगळता त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. छातीत कंजेशन, खोकला आणि कफाचा त्रास जाणवल्याने त्यांना बारामतीहून पुण्यात हलवण्यात आले होते. तेव्हा ते बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी होते.

अजित पवारांचा घातपात ? चौकशीच्या मागणीसाठी आज ‘हे’ गाव बंद राहणार

डॉक्टरांच्या पथकाने घरी तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. सुमारे पाच दिवसांच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. अलीकडेच कुटुंबातील घडामोडींमुळे ते बारामतीत मुक्कामी होते आणि कुटुंबीयांची भेट घेत होते. मात्र, सततच्या ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आणि खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असून, डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Exit mobile version