Download App

Shashikant Shinde राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार? शिंदेंनी सांगून टाकलं…

आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगतले की, आपण पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मलाही तशापद्धतीच्या संधी होत्या. अनेक पक्षांकडून ऑफर आल्या होत्या, मात्र त्या स्विकारल्या नाही.

Shashikant Shinde : राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये (NCP Sharad Pawar group)काही दिवसांपासून शितयुद्ध सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना काही दिवसांपासून उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या वर्धापन दिनाच्या जाहीर सभेत याबद्दल खुद्द पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी भाष्य केलं. त्यावरुन प्रदेशाध्यक्षपदावरुन अंतर्गत कुरबुरी सुरु असल्याचं प्रकर्षानं समोर आलं. त्यानंतर नुकताच आमदार शशिकांत शिंदे यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यावेळी प्रदेशाध्यपदावरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी आमदार शिंदे यांनी आपल्याला पक्षानं कोणतीही जबाबदारी दिली तरी आपण लढणारा सैनिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरुन एकप्रकारे शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी होकार दर्शवला आहे.

दूधवालाच दूध देणार उत्पादकांना न्याय, माजी मंत्री कर्डिले करणार सरकारशी चर्चा…

यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले की, आपण पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मलाही तशापद्धतीच्या संधी होत्या. अनेक पक्षांकडून ऑफर आल्या होत्या, मात्र त्या स्विकारल्या नाही. आपण सगळेजण एकत्र येऊया, एकत्र काम करुया अशा प्रकारच्या ऑफर सर्वच राजकीय पक्षांकडून येत होत्या, पण आमचं एक तत्व आहे, पवारसाहेब एकं पवारसाहेब, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, या विचाराचा मी आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडीमध्ये माझा एकच अजेंडा आहे की, आहे त्या परिस्थितीमध्ये काम करत राहणे, आणि त्याचप्रमाणे पुढे जात राहणे. शेवटी पुढे काय होईल ते पाहून घेऊ, असेही यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

भूमिकेसाठी तुला या लोकांबरोबर झोपावं लागेल, सईने सांगितला कास्टिंगचा धक्कादायक अनुभव

शशिकांत शिंदे यांनी थेट प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याचं सांगितलं नाही, मात्र पक्षाकडून कोणतीही जबाबदारी दिली तर ती आपण प्रामाणिकपणे पार पाडणार असेही यावेळी त्यांनी सांगितले. त्याचवेळी शिंदे यांनी आपण सातारा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक नव्हतो, मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या शब्दाखातर आपण साताऱ्याची लोकसभा लढवली अशी कबुली देखील यावेळी शशिकांत शिंदे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा वर्धापनदिन अहमदनगर शहरात दिमाखात पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावर जाहीरपणे काही मागणी न करण्याची विनंती केली. त्याचं कारणही तसंच होतं. झालं असं की, वर्धापनदिनापूर्वीच पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियावर प्रदेशाध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांना संधी द्यावी, तसेच युवक प्रदेशाध्यपदाची जबाबदारी ही आमदार रोहित पवार यांना द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटामध्ये काहीतरी अलबेल नसल्याचं समोर आलं.

follow us

वेब स्टोरीज