हल्ली कोणीही संजय राऊतांची…; केसरकरांच्या विधानानं वाद पेटणार

Deepak Kesarkar On Sanjay Raut : राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केसरकरांच्या विधानानंतर आता पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (22)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (22)

Deepak Kesarkar On Sanjay Raut : राज्याची कायदा-सुव्यवस्था काही लोकांच्या कोठ्यावर नाचते असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यांच्या या विधानावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केसरकरांच्या विधानानंतर आता पुन्हा शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राऊतांबाबत हे विधान केले आहे.

पंकजा मुंडेंना थेट पंतप्रधान व्हायचयं?; परळीतील विधानानं चर्चांना उधाण

केसरकर म्हणाले की, संजय राऊतांचं बोलणं हे नेहमीच खालच्या पातळीवरचं असतं, हल्ली कोणीही संजय राऊतांची दखल घेत नाही असे म्हणत आज कुणीही त्यांना किंमत देत नाही, असा घणाघात केसरकर यांनी केला आहे. केसरकरांच्या या विधानामुळे राज्यात आता आणखी एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राऊतांनी केलेल्या आरोपांवर संबंधित नेते उत्तर देतील असे केसरकर म्हणाले. भ्रष्टाचार केल्याच आरोप करणं हा एक भाग असतो आणि त्यात काही तथ्य असणं ही वेगळी गोष्ट असते असे ते म्हणाले. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी जनतेच्या हिताचं राहिलं आहे. पण आज ते व्यक्तिगत पातळीवर उतरत आहे, यापेक्षा दुर्देवी गोष्ट नाही, असेही ते म्हणाले.

…म्हणूनच शिंदे-फडणवीस सरकारचा असू शकतो हा डाव

काय म्हणाले होते राऊत?

सध्या सामान्यांना आनंदाचा शिधा मिळत नाही तर तो आमदारांना खोक्यातून शिधा मिळतो, अशी टीका राऊतांनी शिंदे गटावर बोलताना केली होती. राऊतांनी काल एक फोटो ट्विट केला होता. एका रक्ताच्या थारोळ्यातील मुलीचा फोटो त्यांनी ट्विट केला होता. यावरुन त्यांच्यावर बार्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे राऊत म्हणाले आहेत. त्या मुलीच्या आईने माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. तिच्या आईने मला मदत मागितली, म्हणून मी हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला, असे ते म्हणाले आहेत.

तसेच स्वत: च्या घरातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापन केली जाते. एका चुंबन प्रकरणाच्या व्हि़डीओवरुन चौकशी केली जाते. पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीचा फोटो ट्विट केला म्हणून एका खासदारावर, एका पत्रकारावर गुन्हा दाखल होतो ही या राज्याची कायदा व सुव्यवस्था कशी काही लोकांच्या कोठ्यावर नाचत आहे हे यावरुन स्पष्ट होते, असे राऊत म्हणाले आहेत.

हक्कभंग समितीला मी उत्तर देणार आहे. पण जे तक्रारदार आहेत त्यांनाच न्यायाधीश केले आहे. ज्यांच्यावर मी गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, ते राहुल कुल त्यांच्या या हक्कभंग समितीमध्ये समावेश आहे, असे राऊत म्हणाले आहेत. तसेच विधीमंडळाला चोरमंडळ मी कधीच म्हटलेले नाही. ज्यांनी खोके घेतले त्यांनी चोर म्हटलेले आहे, असे म्हणत राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

Exit mobile version