शिंदेंच्या मंत्र्यांचं ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण; डिनर डिप्लोमसीने राजकीय चर्चांना उधाण

Pratap Sairnaik यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

_LetsUpp (5)

uddhav thackeray eknath shinde

Shinde’s minister Pratap Sairnaik invite Thackeray for dinner; Dinner diplomacy sparks political discussions : सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांकडून आपल्या आमदारांना जेवणाचे निमंत्रण दिले जात आहे. त्यावेळी सभागृहामध्ये मांडल्या जाणाऱ्या विविध विषयांवर चर्चा केली जाते. त्याचबरोबर रणनीती देखील आखली जाते.

मोठी बातमी, भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोर गोळीबार; 1 जण जखमी

मात्र या डिनर डिप्लोमसी दरम्यान एका घडामोडीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलयं. कारण एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून यामागे नेमकं कारण काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

…म्हणून अचानक ट्रेंडिंगला आली प्रियंका चोप्रा; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

अधिवेशनाच्या दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री प्रताप सरनाईक यांना ठाकरे गटाला जेवणाचे निमंत्रण देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांनी यावर सकारात्मक उत्तर दिलं. सरनाईक म्हणाले की, राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही? तसेच राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे मित्र पक्षासह विरोधी पक्षातील आमदारांना देखील निमंत्रण देईल.

खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वस्तू व सेवा कर दिन मोठ्या उत्साहात साजरा

तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी देखील आपण मैत्री आणि माणुसकीमुळे ही निमंत्रण स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यामागील राजकारण नेमकं काय? यातून ठाकरे गटावर दबाव आणण्याचा प्रयत्न तर नाही ना असंही बोललं जात आहे. कारण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सध्या शिंदेगट हा बॅकफूटवर आलं आहे.

Exit mobile version