Download App

‘बाळासाहेबांच्या आसनाची किंमत फक्त 10 हजार’; ‘एसीबी’च्या कारवाईवर साळवींचा संताप

Shivsena UBT MLA Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मागच्या महिन्यात त्यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. झाडाझडतीही घेतली. राजन साळवी यांची चौकशीही केली. यानंतर एसीबीने (ACB) त्यांच्या घरातील वस्तूंची एक यादी तयार करून त्यांच्या किंमतीही निश्चित केल्या आहेत. या यादीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्चीही आहे. ही खुर्ची आणि बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत दहा हजार रुपये निश्चित केल्याचे कागदपत्रांत दिसत आहे. या प्रकारावर आमदार साळवी यांनी फेसबूक पोस्ट लिहिली आहे. ‘ज्यांना बाळासाहेबांनी घडवले नावारुपाला आणले त्या राज्यकर्त्यांच्या आदेशाने माझे निवास्थानातील बाळासाहेबांच्या आसनाचे व माझ्या निष्ठेचे मोल करावे हे दु्र्दैवी आहे’, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी या पोस्टद्वारे दिली आहे.

ACB Raid : अनेक धक्के सहन केलेत, काही फरक पडत नाही; राजन साळवींनी स्पष्ट सांगितलं

साळवी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी माझ्या रत्नागिरी येथील घरी अँटी करप्शन विभागाने धाड टाकली. सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन त्यांनी केले. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन दादर येथे बसून शिवसेना चालवली. आज जे राज्यकर्ते झालेत त्यांना नावारुपाला आणेल त्यांच्याच आदेशाने त्या माझ्या घरातील आसनाची किंमत ठरवावी दुर्दैवीच ना…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना महाराष्ट्रभर तळागाळात रुजवली ते आसन मी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्या परवानगीने माझ्या निवासस्थानी नित्य पूजेसाठी आणले. त्यावेळी माझा मुलगा अथर्वने बाळासाहेबांचे एक सुंदर चित्र रेखाटले. माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनाची नित्यनेमाने पूजा करतो परंतु, दु्र्दैवाची गोष्ट म्हणजे माझ्या रत्नागिरीतील राहत्या घरी एसीबीने धाड टाकली व त्या आसनाची आणि फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो त्यांची किंमत ठरवली खूप दुर्दैवी, अशा शब्दांत साळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, आतापर्यंत राजन साळवी यांनी सहा वेळा अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. तर अर्धा तासाहून जास्त वेळापर्यंत साळवी यांच्या घरामध्येही झडती घेण्यात आली होती. यावेळी राजन साळवी देखील काही वेळातच या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांनी सांगितलं होतं की, या एसीबीच्या पथकाचे मी स्वागत केलं आहे. अँटी करप्शन ब्युरोने नोटीस दिल्यानंतरच मला हे अपेक्षित होतं की, अशाप्रकारे हे पथक आमच्या घरापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारची चौकशी होणार याची कुणकुण अगोदरच लागली होती. असं म्हणत आपण साळवी यांनी दोषी आढळणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.

 

follow us