Download App

Sanjay Raut : ’11 तारखेला हिशोब होणारच!’ राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटाला निशाण्यावर घेतले आहे. मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर फिरवल्याचा मुद्दा याला कारणीभूत ठरला आहे. या राजकारणावर राऊत यांनी सडकून टीका केली आहे. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. ज्यांनी पाप केलं त्यांचा हिशोब होईल असा इशारा राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, मुंब्रा भागात शिवसेना शाखा तोडली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारच स्ट्रक्चर उभं आहे. बेकायदेशीर सरकार चालवत आहे. त्यांच्यावर बुलडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शाखेवर बुलडोझर फिरवता त्यांना लाज वाटत नाही का? बाळासाहेबांच्या शाखा आजही आहेत निष्ठावंत शिवसैनिक त्या ठिकाणी बसत आहेत. महाराष्ट्रात ही मोगलाई सुरू आहे का? शाखा तोडत आहेत तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, असे आव्हान राऊत यांनी दिले.

Sanjay Raut : ‘मुश्रीफ, अजितदादा अन् भुजबळ ‘महादेव अ‍ॅप’ मेंबर’ राऊतांचा गंभीर आरोप

11 तारखेला हिशोब होईल 

11 तारखेला चार वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सर्व शिवसैनिक ज्या शाखेवरती बुलडोजर फिरवला तिथे आम्ही जाणार आहोत. शिवसैनिक जनतेला भेटणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. या तुम्ही बुलडोजर घेऊन. गृहखातं काय करत आहे. हे काय कायद्याचे राज्य आहे का? आज तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याचा गैरव्यवहार करत आहात. आज सत्ता तुमच्याकडे उद्या आमच्या हातात असेल हे विसरू नका.

अर्ध्या मंत्र्यांवर अटक वॉरंट, कायदा काय शिकवता ?

पोलीस आयुक्त तुमचा चपराशी आहे. खोटे पुरावे देण्यामध्ये हे सरकार अखंड आहे. तुमचे खरे पुरावे जेव्हा समोर येतील तेव्हा बोंबलू नका. शिवसैनिकांचे मॉरल कधीच डाऊन होत नाही. शिवसैनिक मनानं मनगटानं खंबीर आहे. निवडणुका घ्या नंतर कळेल कोणाचा मॉरल डाऊन आहे. शाखा तोडताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता का? शिवसैनिकांना पकडून धरून पोलिसांनी आत टाकले होते. अर्ध्या मंत्र्यांवर अटकेचे वॉरंट आहे तुम्ही आम्हाला कायद्याचे राज्य काय शिकवता? असा जळजळीत सवाल संजय राऊत यांनी शिंदे गटाला केला.

Sanjay Raut : अजितदादांना राजकीय डेंग्यू, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा हल्लाबोल

‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीत निवडणुकीवर चर्चा 

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सिल्व्हर ओक येथे भेट झाली. या बैठकीवरही राऊत यांनी भाष्य केले. सिल्वर ओकला बैठक झाली महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जी स्थिती निर्माण झाली त्यावर बैठक झाली. जातीजातीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर या बैठकीत चर्चा झाली. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांवरही चर्चा झाली. लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या तरी 31 डिसेंबरनंतर हे सरकार कोसळणार आहे. जागावाटपाचे सूत्र कशा पद्धतीने होणार यावर देखील चर्चा झाली. कोणतेही मतभेद आमच्यात नाही. जागावाटप सुरळीत पार पडेल त्यात कुठलाही तिढा नाही असे राऊत म्हणाले.

Tags

follow us