Sanjay Raut Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज चंदीगड महापौर निवडणूक (Chandigarh Mayor Election) आणि ईव्हीएमच्या घडामोडींचा संदर्भ देत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपा डरपोक पक्ष आहे. ईव्हीएम किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भाजपा जिंकू शकत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
राऊत म्हणाले, हेमंत सोरेन (Hemant Soren) झुकायला तयार नाहीत. नितीश कुमारांसारखे पलटी (Nitish Kumar) मारायला तयार नाहीत. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पलटूराम बनायला तयार नाहीत. त्याची किंमत ते चुकवत आहेत मात्र इंडिया आघाडी त्यांच्यासोबत (INDIA Alliance) आहे. उत्तर प्रदेशमध्ये 300 ईव्हीएम मशीन एका दुकानात मिळाल्या आहेत. आसाममध्ये एका कारमधून 400 मशीन मिळाल्या आहेत.
ईव्हीएम बनवणारी सरकारी कंपनी जी आहे त्यावर चार डायरेक्टर भाजपाचे आहेत. ईव्हीएम मध्ये लावलेला सिक्रेट कोड देखील त्याच कंपनीत बनतो. २०२४ मध्ये निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जाण्याची तयारी आहे त्यात दोन पॅर्टन आणि दोन फॉर्मुले आहेत. मनसुखभाई किंवा चंदीगड पॅटर्ननेच भाजप आता निवडणूक लढणार असल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल
ईव्हीएम हटी, भाजपा गई
या देशात भाजप निवडणुकीच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही निवडणुका जिंकू शकत नाहीत. ईव्हीएम हटी, भाजप गई, ईव्हीएम है तो मोदी है असा खोचक टोला राऊतांनी लगावला. मुंबई महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत ते भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत. खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा. त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत ते जाहीर करा. लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
मोदी फक्त प्रचारासाठी राज्यात येतात
मोदींना महाराष्ट्रात वारंवार यावं लागेल, कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला आणि त्यांची जी काही कथाकथित महायुती आहे, लोकसभेच्या चार जागा ही ते जिंकू शकत नाहीत. म्हणून मोदींना वारंवार या ठिकाणी प्रचारासाठी यावं लागत आहे. मोदी विकासकामांचे उद्घाटन करायला येत नाहीत, तर प्रचारासाठी येतात. त्यांना प्रचार करू द्या.
Sanjay Raut : अस्वस्थ वाटत असेल तर राजीनामा द्या! राऊतांचे भुजबळांना आव्हान