Download App

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा, 2024 मध्ये आम्ही.. राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आज घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस शू्र्पणखेच्या भूमिकेत गेले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शू्र्पणखा आणि या शूर्पणखेचे 2024 मध्ये नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार प्रहार केले.

Sanjay Raut : महानंदच्या 27 एकरवर गुजरात लॉबीचा डोळा; राऊतांचा सरकारवर हल्ला

राऊत पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहात. कोण आला रे कोण आला भाजपचा वाघ आला, असे तुम्ही कधी ऐकले आहे का. बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसेना हीच खरी वाघांची सेना आहे. बाबरी पाडल्यानंतर त्याचे आरोपपत्र एकदा फडणवीस यांनी पाहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेलेचपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शूर्पणखा आणि या शूर्पणखेचं नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी जहरी टीका राऊत यांनी केली.

अयोध्येच्या आंदोलनात हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. एकट्या दैनिक सामनावरच 150 खटले दाखल झाले होते. बाळासाहेब ठाकरे आणि मी स्वतः लखनऊच्या सीबीआय न्यायालयात दाखल झालो होतो, अशी आठवण राऊतांनी यावेळी सांगितली. अनेक शिवसैनिक अयोध्या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपबरोबरोबर गेलेल्या शिंदे गटातील शेळ्या मेंढ्या त्यावेळी तिथे नव्हत्या. देवेंद्र फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत गेले असून अनेक मायावी रुपे धारण करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. 2024 मध्ये या शूर्पणखेचं नाकच कापू, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

टीव्ही लावला की नको त्याचं तोंड पाहावं लागतं, मंत्री विखेंचा संजय राऊतांवर घणाघात…

 

follow us