Download App

पीएम मोदींनंतर ठाकरे गटाचेही ‘नाशिक’ पॉलिटिक्स; 22-23 जानेवारीला महाआरती अन् अधिवेशन

Image Credit: Letsupp

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये आले होते. येथे त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. युवा महोत्सवालाही हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांत नाशिक येथे शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाची माहिती आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेने नाशिकला अधिवेशन फक्त यासाठीच घेतलं आहे की एकतर 23 तारीख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. तसेच रामायणात अयोध्येनंतर पंचवटी हे सर्वात महत्वाचं ठिकाण आहे. पंचवटीत प्रभू श्रीराम, माता सिता आणि बंधू लक्ष्मण यांचं वास्तव्य होतं. खरं रामायण पंचवटीत घडलं. त्यादृष्टीने पंचवटीची जागा अतिशय पवित्र आहे. म्हणून आम्ही अधिवेशनासाठी नाशिकची निवड केली.

काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींना आमंत्रण; भाजपवर निशाणा साधत ठाकरेंची ‘तिरकी’ चाल

शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन हे 22 आणि 23 जानेवारीला नाशिक येथे होईल. प्रत्यक्ष अधिवेशन 23 तारीखला सुरू होईल. अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शन,पूजा त्यानंतर गोदावरीवर महाआरती असा एक 22 तारीखेचा कार्यक्रम आहे. सायंकाळी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. त्यानंतर गोदावरी तीरावर आगमन होईल आणि महाआरती होईल. याआधी दीड वाजता उद्धव ठाकरे ओझर विमानतळावर उतरून थेट भगूर येथे जातील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारकाला तिथे भेट देतील. तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण नाशिकला आलो आणि वीर सावरकरांचं स्मरण झालं नाही हे आमच्याकडून होणार नाही.

23 तारखेला डेमोक्रसी क्लब येथे अनेक राजकीय ठराव केले जातील. राज्यभरातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि शिवसेनेच्या वाटचालीची पुढील दिशा ठरवली जाईल. अधिवेशनंतर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होईल. 22 आणि 23 तारखेला शिवसेना महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मातोश्रीबाहेर घातपाताचा कट? संजय राऊत म्हणाले, भाजपचं षडयंत्र, ठाकरेंच्या सुरक्षेची जबाबदारी

जनता न्यायलायात नार्वेकरांचा खोटारडेपणा उघड 

जनता न्यायालयात विधानसभा अध्यक्षांचा खोटारडेपणा आम्ही उघड केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या लोकांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

follow us

वेब स्टोरीज