शिवसेनेतून शिवसेनेत गेलोय, पण झोडायला आणि तोडायला कुणीचं कमी नसतं; नागेश पाटील आष्टीकरांचा राऊतांना इशारा

Nagesh Patil Ashtikar- सगळ्या गोष्टी करून सगळं करत असतो. सावध नसताना काही प्रयत्न झाला तरत्याच्यानंतरचे परिणाम काय होतील हे सगळ्यांना माहिती.

Nagesh Astikar

Nagesh Astikar

Nagesh Patil Ashtikar On Sanjay Raut : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यानंतर खासदार आष्टीकर यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले आहेत. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या फोडून-झोडून काढण्याच्या विधानाला आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आष्टीकर म्हणाले, जहरी बोलणे टाळले पाहिजे. बरचसे लोक वेगळी भाषा बोलत आहेत. राऊतसाहेब म्हणाले फोडून काढून. त्यांनी काही म्हटल तरी हरकत नाही. ते वडिलांप्रमाणे आहेत. पण झोडायला आणि तोडायला कुणीच कमी नसते. सगळ्या गोष्टी करून सगळं करत असतो. सावध नसताना काही प्रयत्न झाला तरत्याच्यानंतरचे परिणाम काय होतील हे सगळ्यांना माहिती आहे, असा इशारा आष्टीकर यांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ उत्साहात संपन्न


18 जूनपर्यंत कुठेच गेले नव्हते-आष्टीकर

मी कुणावर नाराज होऊन गेलेलो नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज नाही. उद्धव ठाकरे यांनी मला खूप प्रेम दिले आहेत. संजय राऊत हे मोठी मंडळे बोलत असतील, त्यांना हक्क आहे. त्यांनी मला प्रेम केले आहे. ते बोलतील अडचण नाही. ते वडिलांसारखे आहेत. ते बोलले तरी वाईट वाटणार नाही. 18 जूनपर्यंत आम्ही कुठेच गेले नव्हते. ज्या पद्धतीने गैरविश्वास, बोलण्याचा अतिरेक झालं आहे. त्यानंतर बरचशा मंडळीने विचार केला की इथे थांबून उपयोग नाही, असा गौप्यस्फोट आष्टीकरांनी केला आहे.


बंडानंतरची पहिली मोठी राजकीय चाल; उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातून फुंकणार रणशिंग


सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत

सत्तेशिवाय कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे कदाचित सगळ्या गोष्टीचा विचार करून पाऊल उचलले आहेत. माझ्या मतदारसंघात विकासकामे करावी लागतील. लोकांना आशेने निवडून दिले आहे. विरोधात कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नाही. खासदार निधीतून पाच कोटी रुपये मिळतात. ते अपुरे आहेत. जनतेची कामे कशी करायची, निधी कसा मिळवायचा आहे हा प्रश्न होता, असे आष्टीकर म्हणाले. मी काय दुसरीकडे गेलेलो नाही. शिवसेनेतून शिवसेनेत गेलो आहे. विचारधारेला सोडून गेलेले नाही. मी शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार आहे, असे आष्टीकरांना स्पष्ट केले.

Exit mobile version