Sanjay Raut On Operation Tiger : ‘बंडखोरांना तुडवा’ संजय राऊतांच्या विधानानंतर 6 खासदारांना Y+ सुरक्षा

Sanjay Raut On Operation Tiger : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याने राज्यातील राजकारण

Sanjay Raut On Operation Tiger

Sanjay Raut On Operation Tiger : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना बंडखोरांना तुडवा असं म्हटल्यानंतर धाराशिव, परभणी, शिर्डी, मुंबई आणि यवतमाळ- वाशिम मतदारसंघात शिवसैनिक आक्रमक झाले असून विरोधप्रदर्शन करत आहे.

तर आता गुप्तचर विभागाने मोठा निर्णय घेत ऑपरेशन टायगरमध्ये (Operation Tiger) नाव आलेल्या सर्व सहा खासदारांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. गुप्तचर विभागाने या खासदारांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे. गुप्तचर विभागाने या सर्व खासदारांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आता या खासदारांच्या निवास्थानी आणि सोबत 24 तास पोलीस कर्मचारी राहणार आहे.

नेमकं काय म्हणाले होते खासदार संजय राऊत ?

दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, तुम्ही ज्यांची नावं घेताय, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं आता सांगतो तोडून दाखवा, तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का ? ईडी, सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करताय असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

उज्ज्वल निकम यांनी ठाकरे गटाच्या बैठकीची हवाच काढली…म्हणाले व्हिप लागू होत नाही..-

बैठकीत हजर राहणारे खासदार

आज दिल्ली येथे आयोजित ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या बैठकीत राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह लोकसभा खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) , अनिल देसाई (Anil Desai) , राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) उपस्थित आहे. तर परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांनी गैरहजर असल्याने आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

follow us