‘अजितदादांचं नाव कसं सोडणार?’; सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला पुरुषोत्तम जगतापांचं सणसणीत प्रत्युत्तर

Someshwar Sugar Factory Election; बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Someshwar Sugar Factory Election

Someshwar Sugar Factory Election

Someshwar Sugar Factory Election: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि बंडखोरीमुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलसमोर राष्ट्रवादीचे नेते पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ उभे केले आहे.

‘हिटलरने स्वतःला गोळी घातली’; तशी वेळ येऊ नये, भाजपने लक्षात ठेवावं, उद्धव ठाकरेंचा इशारा

जगताप यांच्या पॅनेलच्या नावावरुन सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांच्या नावाचा वापर न करता स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान सुनेत्रा पवार यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याला पुरुषोत्तम जगताप यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

“आम्ही कारखान्याच्या हितासाठी आणि विकासासाठी बाहेर पडलो आहोत. अजितदादांची गणना महापुरुषांमध्ये केली जाते. त्यामुळे मी अजितदादांचं नाव वापरणारच. सुनेत्राताई अजितदादांना सभासदांच्या मनातून आणि हृदयातून कशा बाहेर काढणार?” असा सवाल जगताप यांनी केला.

दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या लेटरहेडवर एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं. अजित पवार यांच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची रीतसर परवानगी घ्यावी, असं आवाहन या पत्रकातून करण्यात आलं होतं.

Drishyam: The Conclusion : बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; दोन दिवसांत 179 कोटींचा गल्ला

या आवाहनानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी वानेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यातील अजित पवार यांचा फ्लेक्स काढून टाकला. मात्र, त्यानंतर झालेल्या मेळाव्यात जगताप यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली.

“अजितदादा सभासदांच्या मनात आणि आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे फोटो लावला किंवा नाही लावला, तरी काहीही फरक पडत नाही,” असं जगताप म्हणाले.

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत 83 उमेदवार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी संपल्यानंतर सोमेश्वर कारखाना निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. निवडणुकीसाठी एकूण 601 अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 514 अर्ज पात्र ठरले, तर तब्बल 431 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता 83 उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

दुष्काळाने घेरलं, नापिकीने मोडलं; मुलीच्या लग्नाची चिंता, शेतकऱ्याने टोकाच पाऊल उचललं

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनेल, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे बारामतीसह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version