Sunetra Pawar Gets Emotional : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. शरद पवारांच्या या वक्तव्यावर सुनेत्रा पवार यांना विचारल्यावर त्यांना अश्रू अनावर झाल्याचे बघायला मिळाले आहे.
अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार यावरून तुम्हाला यावर काय बोलायचं असं विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ऐकून त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले आहे. दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं आवाहन केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवार यांनी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवार यांना निवडून देण्याचं आवाहन केलं यामध्ये चुकीचं काही नाही.
#WATCH | Pune: NCP candidate from Baramati, Sunetra Pawar gets emotional when asked about Sharad Pawar’s remark calling her ‘outsider Pawar’
Sunetra Pawar is the wife of Maharashtra Deputy CM Ajit Pawar and is contesting LS elections against NCP-SCP MP Supriya Sule from… pic.twitter.com/sJauAJa2fg
— ANI (@ANI) April 13, 2024
मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी बाहेरुन आलेले पवार असा उल्लेख करताच पत्रकार परिषदेतील उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. सोबतच शरद पवार यांनाही हसू आवरलं नसल्याचं पाहायला मिळालं होत.
‘छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय’; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं अभिनेता भडकला
अजित पवार यांनी काय आवाहन केलं होत?
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमदेवारी देण्यात आली आहे. बारामती मतदारसंघात शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशातच सुनेत्रा पवारांसाठी महायुतीकडून बारामतीमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, आत्तापर्यंत बारामतीकरांनी शरद पवारसाहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं, यावेळी आता सुनेला निवडून द्या, आत्तापर्यंत पवारांच्या मागे बारामतीकर उभे राहिलेले आहेत, त्यामुळे सुनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं.