Download App

अजितदादा चुकले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील; बीडच्या पालकमंत्र्यांवरून सुरेश धसांचा इशारा

Suresh Dhas On Ajit Pawar: त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये हा निर्णय अजित पवार यांनी घेतला पाहिजे. त्यांना पद दिल्यास परिणाम वेगळे होतील.

  • Written By: Last Updated:

Suresh Dhas On Ajit Pawar: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांचे जवळचे वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. त्यावरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरले आहे. ते थेट मुंडेंवर आरोप करत आहेत. विधानसभेत त्यांनी या प्रकरणाचा आवाज उठविला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पालकमंत्रीपदावरून मोठे विधान केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक इशाराही दिला आहे.

अखेर धनंजय मुंडेंनी केलं स्पष्ट, म्हणाले… वाल्मिक कराड माझ्या जवळचे

धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात राहू नये, त्यांना बीडचे पालकमंत्रिपद देऊ नये, ही जनतेची मागणी आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचं काय ते त्यांनी ठरवावं. बहुतेक लोकांनी शरद पवारसाहेब हे मागे पडले आहेत. त्यामुळे आपल्या पुढचा नेता अजित पवार आहे, या भावनेने लोकांनी अजितदादा यांच्या 41 जागा निवडून दिल्या आहेत. अजितदादा या प्रकरणात चुकले तर त्यांना बरेचसे परिणाम भोगावे लागतील. नाही रे बाबा हे बरोबर नाही. याची एेवजी जुनेच बरे होते. म्हणून पुन्हा लोक शरद पवार यांच्याकडे वळतील. त्यामुळे त्यांनी त्याचं ठरवावे. त्यांना सांगणारे आम्ही कोण ? आम्ही अडीच तालुक्यांचे आमदार आहोत. आम्ही गरीब माणसं आहोत. आमची औकात आहे का अजितदादांना अक्कल शिकवायला. जेवढी आमची अक्कल आहे तेवढी आम्ही शिकवतो, असा टोलाही सुरेश धस यांनी अजित पवार यांनी लगावला आहे.

भाजपला यंदा मिळाली तिप्पट देणगी; काँग्रेसपेक्षा छोट्या राज्यातील पक्षाची मोठी बाजी !


तो किती पळाला तरी तो पकडला जाईल

संतोष देशमुख हत्याकांडाचा पोलिस तपास सुरू आहे. आम्हाला गँरंटी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द वापरला आहे आहे की मी कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे तो आका (वाल्मिक कराड) सुटणार नाही. तो किती पळाला तरी तो पकडला जाईल. मी सभागृहात मागणी केली होती की एसआयटी गठीत करावी. पहिल्यांदा पत्र देताना मी एसपीचा उल्लेख केला होता. त्यामुळे फडणवीस यांनी थेट आयजीच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची एसआयटी स्थापन केली आहे. ती जोरामध्ये काम करत आहे. ही बकरी कुठपर्यंत जाईल. आता थोड्या दिवसात पुढे येईल ? आम्ही व्यक्तिगत म्हटले तर सरकारी अभियोक्ताची नेमणूक करणे, एसआयटीची नेमणूक करण्याची मागणी केलीय. कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर केली, यामध्ये आम्ही समाधानी आहे. आका पकडल्यानंतर आकाच्या आकाचा काय संबंध आहे का? हेही समोर येईल, असे धस यांनी म्हटले आहे. सुरेश धस म्हणाले; छोटे आका आणि मोठे आका कोण आहेत. हे मी आता सांगू शकत नाही. आकाच्या सर्व गाड्या, इतर विष्णू चाटेच्या नावावर आहे. हा विष्णू चाटेच खाली आदेश देत होता. विष्णू चाटे हा खाली सहा लोकांना आदेश देत होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे लाइव्ह त्यांनी केले आहे. त्याला आम्ही कसे मारत आहोत हे लाइव्ह करून सांगितले आहे. हे विष्णू चाटेला आणि आकालाही दाखविले आहे.

मंत्रिमहोदय यांनी मंत्रिपद भाड्याने दिले: धस

आका आणि बाका कुणालाच मी घाबरत नाही. आकापर्यंत मी पोहचलो आहे. आका म्हणजे कोण हे सगळ्यांच माहीत आहे. परंतु मी ते सांगत नाही. आकाच्यावरती कोण आहे. जर मोठ्या आकाचे नाव आले तर मी घेईल. ही प्रथा आणि परंपरा आहे. हे फक्त परळीपर्यंत घडत होते. आता कार्यक्षेत्र वाढविले आहे. आता केजपर्यंत आले आहे. इतर गुंडगिरीचे, खंडणीचे, टक्केवारीचे कार्यक्षेत्र संपूर्ण बीड जिल्ह्यात राबविले जात आहे. अडीच वर्षांपूर्वी सत्ता मिळविल्यानंतर मंत्रिमहोदय यांनी आपले मंत्रिपद, पालकमंत्रीपद भाड्याने दिले होते. लीज अॅग्रीमेंट झाल्यानंतर त्यांनी खाली बघितलेच नाही. काम कसे चालले आहे. त्यामुळे हे प्रकार घडत गेलेले आहे, असा आरोप सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केलाय.

follow us