Suresh Dhas reveal on Chandra Shekhar Bavankules Statement : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानानंतर मस्साजोग प्रकरणी धनंजय मुंडे (Suresh Dhas) यांना कोडींत पकडणारे सुरेश धस यांनी मुंडेंशी सेटलमेन्ट केली आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यात धस यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या बावनकुळेंच्या उपस्थितील मुंडेंसोबतच्या त्या भेटीवर गौप्यस्फोट केला की, बावनकुळे यांनी आपल्याला हे प्रकरण मिटवता येईल का? हे विचारलं होतं. त्यामुळे आता बावनकुळे हेच धस आणि मुंडेंमध्ये समेट घडवून आणू इच्छित आहेत का? त्यांनाच हे प्रकरण मिटवायचं आहे का? असं देखील बोललं जात आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
यावेळी बोलताना धस म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला जेवायला बोलावलं होतं. त्यासाठी मी तिथे गेलो होतो. पण अचानकपणे तिथे धनंजय मुंडे आले. आमच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. मात्र प्रदेशाध्यक्ष हे माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. तरी देखील त्यांच्याकडून काहीतरी सांगण्यात चूक झाली असेल.
सुरेश धस कधीही पलटतील खात्री होती म्हणूनच…, मुंडे भेटीवर अंजली दामानिया संतापल्या
मात्र त्यांनी आम्हाला हे प्रकरण मिटवता येईल का? असं वाक्य वापरलं होतं. पण मी त्याच वेळी क्लिअर कट त्यांना सांगितलं होतं की, हे प्रकरण चौकशी झाल्याशिवाय मिटणार नाही. त्याचबरोबर आमच्यामध्ये मनभेद नाहीत पण मतभेद तर आहेतच. त्यामुळे मी या प्रकरणात माघार घेणार नाही. असं मी त्यांना यावेळी स्पष्ट सांगितलं होतं.
चार तासांत दोघांनी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा…’, जितेंद्र आव्हाडांनी धसांना लगावला टोला
तर पुढे बोलताना धस म्हणाले की, मी धनंजय मुंडे यांना परवा रात्री एक माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो होतो. त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. मात्र मी त्यानंतर लगेचच त्यांच्यावरील आरोपांच्या संदर्भातील काही कागदपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सेटलमेंट झालेली आहे. असा दावा धस यांनी केला आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे माझ्यासोबत चार तास एकत्र होते त्यावेळी मी पाहिला की त्यांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत त्यामुळे ते दूर होतील आयुष्यात एक काळ असा असतो तो मतभेद दूर करतो तसेच मी पक्षाचा अध्यक्ष आहे दोघेही मला भेटले या दोघांत पारिवारिक भेट झाली आहे परिवार म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं मात्र दुसरीकडे धस यांनी मला बावनकुळे यांनी जेवायला बोलवलं होतं त्यावेळी अचानक धनंजय मुंडे येथे आले आणि आमच्या चार तास चर्चा झाली नाही त्याचबरोबर बावनकुळे यांनीच आपल्याला हे प्रकरण मिटवून घ्या असं म्हटलं म्हणत बावनकुळेनाच खोटं पाडलं का? अशा चर्चा सुरू आहेत.