चार तासांत दोघांनी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा…’, जितेंद्र आव्हाडांनी धसांना लगावला टोला

चार तासांत दोघांनी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा…’,  जितेंद्र आव्हाडांनी धसांना लगावला टोला

 Jitendra Awhad Criticize Suresh Dhas And Dhananjay Munde : आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या भेटीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी अन् विरोधक दोन्ही बाजूंनी टीका होताना दिसत आहे. यावरून आता शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी सुरेश धस यांना घेरलंय.

मोठी बातमी! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा येणार, डीजीपींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

सुरेश धस धनंजय मुंडे यांना साडेचार तास का भेटले असतील? याचं उत्तर कोणाकडे आहे का? साडेचार तासांमध्ये या दोघांनी काय केलं असेल? असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट चार दिवसांपूर्वी (Maharashtra Politics) झाली. ही भेट साडेचार तास होती, त्यामुळं लपून भेटले असं बोलणं योग्य वाटणार नसल्याचं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, यांच्याकडून मानवी स्वभावाचा अभ्यास करावा लागेल. डिसेंबर महिन्यापासून सुरेश धस धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होते. त्यानंतर ते अचानक म्हणाले की, मी राजीनामा मागितलेलं नाही. कदाचित आम्ही चुकीचं ऐकलं असेल, टीव्हीवाल्यांनी चुकीचं दाखवलं असेल, परंतु हे प्रकरण बावनकुळेंनी सांगितल्यामुळं उघड झाल्याचं म्हटलंय.

बावनकुळेंची मध्यस्थी… धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात समझौता? गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सुरेश धस यांच्या वागण्यात सध्या फरक दिसतोय. ते आता सध्या संत झाले आहेत. क्षमाशील होवून संत परंपरेवर चालत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला देखील त्यांनी सल्ला दिलाय. माफ करण्यास सांगितलंय. तसंच त्यांनी धनंजय मुंडे यांना माफ केलंय. प्रश्न विश्वसार्हतेचा असतो, असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय. एवढ्या प्रामाणिकपणे हा माणूस लढत होता, पण अचानक यु टर्न का मारला? हे कळायला मार्ग नसल्याचं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड यांनी साडेचार तासांत काय केलं असेल? यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’ या गाण्याचं उदाहरण देत टोला लगावला आहे. ते दोघे भेटले, यावर काही बोलायचं नसल्याचं देखील आव्हाड म्हणालेत. दोघं मित्रच होते, बीडच्या राजकारणात दोघांचंही सख्ख असल्याची टीका त्यांनी केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube