Download App

‘आकां’चे आका मुंडे, अन् ‘सरताज’ देवेंद्र फडणवीस, अंधारेंनी नवीन शोध लावला…

धनंजय देशमुख हे आत्महत्सेसाठी प्रवृत्त होतात, याला कारण समस्त आकाचे सरताज देवेंद्र फडणवीस, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप.

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमु (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंधारेंनी केला. तसेच हा जीवघेणा खेळ थांबवा, असं आवाहन देखील अंधारेंनी केलं.

जिथं अनेक काम बाकी तिथं मला संधी मिळाली त्यामुळे… पंकजा मुंडेंचं मंत्री झाल्यानंतर पहिलं भाषण 

धनंजय देशमुख हे आत्महत्सेसाठी प्रवृत्त होतात, याला कारण समस्त आकाचे सरताज देवेंद्र फडणवीस हे गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप अंधारेंनी केला.

सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना आणि तपास यंत्रणांबद्दल अविश्वास व्यक्त करत त्यांनी हे आंदोलन केलं. चार तासांनंतर त्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी त्यांच्या या आंदोलनामुळं आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमधून त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

कुंभमेळ्यात शेअर बाजार का घसरतो? मागील 20 वर्षातील धक्कादायक इतिहास 

अंधारेंनी लिहिलं की, उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात याला कारण समस्त आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस जी हे गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. सध्या मस्साजोगमध्ये जे चाललंय ते पाहता संतोष देशमुखांची हत्या भाजप इष्टापत्ती म्हणून बघत आहे का? फडणवीस साहेब हा जीवघेणा खेळ थांबवा, असं आवाहन अंधारेंनी केलं.

…तर तुम्ही आजच अपयशी झाला आहात – जरांगे
मुख्यमंत्री साहेब तुमचे चुकीच पाऊल पडायला लागला आहे, जोपर्यंत तुमचे पाऊल चुकीच पडत नव्हते तेव्हा समाज शांत होता. मुख्यमंत्री तुम्हाला भेटून देशमुख कुटुंबीय हाताश होत असेल तर तुम्ही आजच अपयशी झाला आहात. तुमचे सरकार खंडणी खोर चालवतो की काय ? अशा पद्धतीने वागत असल्याचेही जरांगे म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला. यामुळे महाराष्ट्र शांत आहे. परंतु तपास यंत्रणेचे हात बांधलेली आहे की काय अशी शंका येत आहे. आता सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. ती आजच देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

 

follow us