तुम्ही खाली या! संतोष देशमुखांच्या भावाला विनवणी करताना जरांगे धाय मोकलून रडले
मस्साजोग : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळावा यासाठी त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलन सुरू केले असून, धनंजय यांनी खाली यावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जरांगे यांनी धनंजय यांच्याशी फोनवर संवाद साधून त्यांना खाली येण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांचा कंठ दाटून आल्याचे पाहण्यास मिळाले. तर, टाकीवर आंदोलन करणाऱ्या धनंजय यांच्या डोळ्यातही यांचे डोळेही जरांगेंशी बोलताना पाणावले होते.
कराडने नोव्हेंबर महिन्यातच दिली होती धमकी; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या जबाबाने खळबळ
…तर मी यांना सोडणार नाही – जरांगे
धनंजय देशमुख यांनी न्याय मिळावा यासाठी गावातील उंच टाकीवर चढून आंदोलनाचे हत्यार उपसले असून, त्यांनी खाली यावे यासाठी मनोज जरांगे यांनी त्यांना विनंती केली. तसेच तुम्हाला काही झाले तर मी यांना सोडणार नाही असा इशाराही राज्य सरकारला दिला. धनंजय यांच्याशी संवाद साधताना तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे तुम्ही प्लीज खाली या अशी विनवणीदेखील जरांगे यांनी केली. तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही प्लीज खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही खचून जाऊ नका. आपल्याला संतोष भैय्याला न्याय द्यायचा आहे. माझी विनंती आहे तुम्हाला प्लीज तुम्ही खाली या, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा बॅास मंत्रिमंडळात, राऊतांचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला
जरांगेंच्या विनवणीला यश
गावातील ज्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी आंदोलन करत आहे. तेथून त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी आणि पोलीस दाखल झाले असून, दुसऱ्या एका टाकीवर पोलिसांकडून धनंजय देशमुख यांचे मनपरिवर्तन करण्याची विनंती करत आहेत तर, खाली उभे असलेल्या जरांगेंकडून वेळीवेळी त्यांना खाली येण्याची विनंती केली. त्यानंतर अखेर धनंजय देखमुख खाली येण्यास तयार झाले असून, अग्नीशमन देलाच्या मदतीने त्यांना खाली उतरवले जात आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या विनवणीला यश आले आहे.
ब्रेकिंग! लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन, जरांगे समर्थकावर गंभीर आरोप
धनंजय देशमुख यांचा फोन स्वीच ऑफ
सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज (दि.13) गावातील टॉवरर चढून उडी मारणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. परंतु, आंदोलनाच्या ठिकाणी धनंजय देशमुख आले नाही. गावकऱ्यांनी त्यांचा संपूर्ण गावात शोध घेतला मात्र, ते सापडून आले नव्हते. तसेच त्यांचा फोनदेखील स्वीचऑफ होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर काही गावकऱ्यांना आमचा गावचा एक पोरगा यांनी मारला आता धनंजयला पण यांनी गायब केले का? अशी भीती गावकऱ्यांनी बोलताना व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर गावातील एका उंच टाकीवर धनंजय देशमुख आढळून आले. त्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.