Sushma Andhare News : भाजपचे नेते उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्या ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Gosde) ठाकरे गटात कमबॅक करणार असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
“फडणवीसांनी भाजपाचे मोठे नेते संपवले, भाजप म्हणजे”.. सुषमा अंधारेंची जळजळीत टीका
सुषमा अंधारे म्हणाल्या, भाजपचे नेते उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे. पाटील ठाकरे गटात येतील की नाही याबाबत मला माहित नाही, पण नाशिक लोकसभेतून उमेदवारी मिळणार नसल्याने हेमंत गोडसे ठाकरे गटात कमबॅक करणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भाजपकडून सर्वेचं कारण दाखवून जास्त जागा पदरात पाडून घेत असल्याचा आरोपही अंधारेंनी केलायं.
अजय देवगणच्या वाढदिवशी Maidaan चा शेवटचा ट्रेलर रिलीज; कोण आहेत? सय्यद अब्दुल रहीम
तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे शिंदे गटातील हेमंत गोडसे महायुतीला धक्का देत नाशिक मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांचं नाव महायुतीकडून जवळपास फिक्स झालं असल्याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार उतरविला ! अकोल्यातून डॉ. अभय पाटलांना उमेदवारी
हेंमत गोडसे आणि शिवसेना पदाधिकारी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यानंतर देखील शिंदे गटासाठी नाशिकची जागा सुटली नाहीतर हेंमत गोडसे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. नाशिक मतदारसंघातून शिंदे गटातील हेंमत गोडसे यांची उमदेवार निश्चित मानली जात होती मात्र अचानक छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानं शिंदे गटात अस्वस्थता पसरली. यामुळे आता छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमदेवारी जाहीर झाल्यानंतर गोडसे आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
दरम्यान, नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरुन शिंदे गटात रणकंदन सुरु असतानाच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हेमंत गोडसे ठाकरे गटात दाखल होणार असल्याचा दावा केला आहे. अद्याप हेमंत गोडसे यांच्याकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. आता नाशिकची जागा कोणाला मिळणार? हेमंत गोडसेंना शिंदे उमेदवारी देणार का? उमेदवारी न मिळाल्यास गोडसे ठाकरे गटात जाणार का? या प्रश्नांची उत्तर पुढील काळातच स्पष्ट होतील.