“फडणवीसांनी भाजपाचे मोठे नेते संपवले, भाजप म्हणजे”.. सुषमा अंधारेंची जळजळीत टीका

“फडणवीसांनी भाजपाचे मोठे नेते संपवले, भाजप म्हणजे”.. सुषमा अंधारेंची जळजळीत टीका

Sushma Andhare Criticized Devendra Fadmnavis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. या भेटीवरून विरोधी पक्षांतील नेते अस्वस्थ झाले आहेत. या नेत्यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare) भाजपवर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी एक एक करून भाजपातील मोठे नेते संपवले, अशी टीका अंधारे यांनी केली.

हायहोल्टेज ड्रामा तरीही सुषमा अंधारेंचा कार्यक्रम यशस्वी; बार रुममध्ये वकिलांशी संवाद 

अंधार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबद्दल विचारले. त्यावर अंधारे म्हणाले, राज ठाकरेंनी कुठे जावे हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपाकडे स्वतःचे नेते शिल्लक राहिलेले नाहीत. फडणवीसांनी एक एक करून त्यांचे सर्व नेते संपवले आहेत. त्यामुळे भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून नेते आयात करावे लागत आहेत. ठिगळ्या ठिगळ्यांच गोधडी म्हणजे भाजप असेच आता म्हणावे लागेल, अशी टीका अंधारे यांनी केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली जात आहे. यावर अंधारे म्हणाल्या, कल्याण लोकसभेसंदर्भात कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्यांचा मी आदर करते. पण, मी कोणत्याही मतदारसंघासाठी इच्छुक नाही. कल्याण लोकसभा मतदारसंघाचा निर्णयही येत्या दोन ते तीन दिवसांत आपल्याला कळेल, असे अंधारे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी दोन जागांचा प्रस्ताव मांडला. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन जागा मागितल्या. परंतु, अमित शाह यांनी हा प्रस्ताव फेटाळला. एक जागा नक्की देऊ पण दुसरी जागा देणं अशक्य असल्याचं अमित शाह म्हणाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर पुढं कसं जायचं याबाबत माहिती राज ठाकरेंनी विचारली त्यावर आताच काही आश्वासन देणं शक्य होणार नसल्याचं अमित शाहांनी सांगितल्याची माहिती आहे.

सुषमा अंधारे कल्याणमध्येच शिंदेंची कोंडी करणार ? स्थानिक पदाधिकाऱ्यानेच आखला ‘प्लॅन’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube